शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डी खटल्याची दुसऱ्या दिवशीही सुनावणी स्थगित

By admin | Updated: March 11, 2017 00:52 IST

आरोपीचे वकील न्यायालयात हजर नसल्याने कोपर्डी अत्याचार व खून खटल्याची सलग दुसऱ्या दिवशीही शुक्रवारी सुनावणी स्थगित करावी लागली़ पुढील सुनावणीच्या वेळी

अहमदनगर : आरोपीचे वकील न्यायालयात हजर नसल्याने कोपर्डी अत्याचार व खून खटल्याची सलग दुसऱ्या दिवशीही शुक्रवारी सुनावणी स्थगित करावी लागली़ पुढील सुनावणीच्या वेळी वकिलांना न्यायालयात हजर ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत़ जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर कोपर्डी खटल्याची सुनावणी सुरू आहे़ गुरुवारी या खटल्यातील आरोपी क्रमांक दोन संतोष भवाळ याचे वकील बाळासाहेब खोपडे यांचा अनुपस्थित राहण्याचा अर्ज ऐनवेळी न्यायालयात सादर करण्यात आला होता़ शुक्रवारी सुनावणीच्या वेळी आरोपीने वकिलाची पर्यायी व्यवस्था करावी, असे न्यायालयाने सूचित केले होते़ शुक्रवारी दुपारी १२ वाजता सुनावणी सुरू झाली तेव्हा खोपडे हे आजारी असल्याने येऊ शकणार नाहीत, असे न्यायालयात कळविण्यात आले़ त्यावर सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड ़ उज्ज्वल निकम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोपर्डी खटला हा महत्त्वाचा असून, अंतिम टप्प्यात आहे़ अशा वेळी आरोपीच्या वकिलांनी गैरहजर राहण्याविषयी आधी कळविणे गरजेचे आहे़ ते याआधीही गैरहजर राहिले होते़ न्यायालयाने त्यांना समज द्यावी, असे त्यांनी नमूद केले़ शुक्रवारी कर्जतचे तहसीलदार, ठाणे अंमलदार यांच्यासह आणखी दोन अशा एकूण चार साक्षीदारांच्या साक्ष होणार होत्या़ सुनावणी न झाल्याने त्यांना परत जावे लागले़ खटल्याची पुढील सुनावणी आता १७, १८, १९ व २० मार्च दरम्यान होणार आहे़ (प्रतिनिधी)सरकारी पक्ष तपासणार नवीन साक्षीदारकोपर्डी खटल्यात एक नवीन साक्षीदार तपासण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शुक्रवारी अ‍ॅड़ निकम यांनी न्यायालयाकडे केली आहे़ या खटल्यात आधी तपासण्यात आलेल्या दत्तात्रय सुद्रिक या साक्षीदाराला कोपर्डी घटनेबाबत पुणे येथे नवनाथ पाखरे या व्यक्तीने माहिती दिली होती़ त्याच्या माहितीवरूनच सुद्रिक याला अत्याचाराची घटना कळाली होती़ त्यामुळे पाखरे या साक्षीदाराचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे़ हा नवीन साक्षीदार असून, पोलिसांनी जबाब घेतलेला नाही़