शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

महिलेवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी ४ RPF जवान निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2016 11:29 IST

दिवा येथे एका २५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपावरून आरपीएफच्या ४ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे

ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. ९ - गेल्या जानेवारीमध्ये दिवा येथे एका २५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपावरून आरपीएफच्या ४ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. आरोपी पोलिसांच्या भीतीमुळे पीडित महिला अत्याचारानंतर इतका काळ गप्प राहिली, मात्र आरोपींपैकी एकाने तिच्याशी पुन्हा संपर्क साधत तिला ब्लॅकमेल करत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर मात्र पीडित महिलेने बुधवारी आरपीएफच्या वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क साधत तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहित देत तक्रार दाखल केली. वरिष्ठांनीही या घटनेची गंभीर दखल घेत त्या चौघांना निलंबित केले आहे. हेड कॉन्स्टेबल पी. के. सिंग (५७) व  बी.के. सिंग (५८), कॉनस्टेबल दीपक राठोड आणि बाघेल सिंग अशी चौघांची नावे आहेत. 
मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला मूळची उत्तर प्रदेशमधील आरोपींपैकी एक असलेले पी.के. सिंग हे ही तिच्याच गावचे असून ती त्यांना काका मानत असे. नव-याशी झालेल्या भांडणानंतर पीडित महिलेने स्व:च्या उदरनिर्वाहासाठी मुंबई गाठले. तेव्हा पी. के. सिंग यांनी तिला काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यासंदर्भातच जानेवारी महिन्यात त्यांनी तिला दुपारच्या सुमारास फोन करून दिवा स्टेशन येथील आरपीएफ कार्याललाय बोलावले. ती तेथे पोहोचली असता पी. के. सिंग व त्यांचे सहकारी दारू पीत अश्लील फिल्म पाहत होते. त्यांनी पीडित महिलेला शीतपेयातूम गुंगीचे औषध दिले व तिची शुद्ध हरपल्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. या घटनेची कोठेही वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही त्यांनी दिली. 
या घटनेला अनेक महिने उलटून गेल्यानंतरही पोलिसांच्या भीतीने ती महिला गप्प राहिली. मात्र काही काळानंतर आरोपींपैकी एकाने तिला ब्लॅकमेल करून शरीरसुखाची मागणी केल्यावर मात्र त्याचा महिलेचा संयमाचा बांध फुटला आणि तिने तत्काळ पोलिसांकडे धाव घेत अत्याचाराची तक्रार दाखल केली. 
यापूर्वी रेल्वेल पोलिसांनी केलेल्या अत्याचाराचा घटना समोर आल्या असून गेल्या वर्षी दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान एका फेरीवाल्या महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप एका जीआरपी कॉन्स्टेबल वर लावण्यात आला होता.