शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

अकार्यक्षम परिवहन व्यवस्थापकांना निलंबित करा

By admin | Updated: July 18, 2016 03:16 IST

केडीएमटीच्या बससेवेबाबत नागरिकांमध्ये दिवसेंदिवस असंतोष निर्माण होत आहे.

कल्याण : केडीएमटीच्या बससेवेबाबत नागरिकांमध्ये दिवसेंदिवस असंतोष निर्माण होत आहे. केडीएमटी उपक्रमाच्या दुरवस्थेला परिवहन व्यवस्थापक देविदास टेकाळे हेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवा, अशी मागणी महापालिकेतील मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ‘केडीएमटी’ची दुरवस्था व आर्थिक डबघाईचे चित्र ‘लोकमत’ने ११ जुलैला ‘आॅन दी स्पॉट’द्वारे मांडले होते. महापालिकेतील विरोधीपक्षनेते प्रकाश भोईर यांनी त्याची दखल घेत याप्रकरणी त्यांनी रवींद्रन यांच्याशी पत्रव्यवहार करून अकार्यक्षम परिवहन सेवेत सुधारणा करण्याची विनंती केली होती. त्यानंतर, हळबे यांनीही रवींद्रन यांना निवेदन सादर करून केडीएमटीतील अधिकाऱ्यांचा बेशिस्तपणा, नाकर्तेपणा व परिवहन व्यवस्थापक आणि प्रशासनावर सत्ताधारी पक्षाचा नसलेला अंकुश याकडे लक्ष वेधले आहे. केडीएमटी उपक्रम सुस्थितीत चालू शकतो, याबाबत उपक्रमातील अधिकाऱ्यांसमवेत अनेकदा अभ्यासपूर्ण, मुद्देसूद पत्रव्यवहार करण्यात आला आहे. यामध्ये रेल्वे स्थानके , महाविद्यालये, तीर्थक्षेत्रे, प्रेक्षणीय स्थळे तसेच महापालिका क्षेत्राच्या आजूबाजूच्या परिसरातील टिटवाळा, पडघा, भिवंडी, मुरबाड, सरळगाव, नवी मुंबई, ठाणे ही शहरे व या शहरांना जोडणारी रस्त्यालगतची व आसपासची गावे यांचा सखोल अभ्यास करून या भागात नियोजित वेळेत परिवहन सेवेच्या बस उपलब्ध करून दिल्यास आपली परिवहन सेवा कधीच तोट्यात चालणार नाही, अशा आशयाचा पत्रव्यवहार करूनही याची साधी दखलही घेतलेली नाही, असे हळबे यांचे म्हणणे आहे.केडीएमटी चांगली सेवा देत नसल्याने चालक आणि वाहक हे नेहमीच नागरिकांच्या रोषास बळी पडत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. उपक्रमातील अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे कर्मचाऱ्यांना वेतन देण्यास नेहमीच दिरंगाई होत आहे. एकंदरीच या वातावरणाचा कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. परिवहन व्यवस्थापकांना स्वत: परिवहन सेवेत नियोजनबद्ध पद्धतीने सुधारणा करण्यात कोणताही रस नसल्याने परिवहन उपक्रमाला लागलेले दुरवस्थेचे ग्रहण ‘जैसे थे’ असल्याकडे हळबे यांनी लक्ष वेधले आहे. १७ वर्षांत आपले बस मार्ग, बस क्रमांक व थांबे निश्चित करता आलेले नाहीत. जे काही मोजके थांबे आहेत, तेथे बेकायदा फेरीवाले आणि रिक्षाचालकांचे अतिक्रमण पाहावयास मिळते. परिवहन सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना ऊन-वारा-पाऊस यापासून संरक्षण देणारे बसथांबे नाहीत. खंबाळपाडा येथील बस आगारातील कचऱ्याच्या गाड्या आणि अस्वच्छता पाहता या आगाराला एकप्रकारे डम्पिंगचे स्वरूप प्राप्त झाल्याचेही हळबे यांनी निवेदनात म्हटले आहे. उत्पन्न आणि खर्चात प्रचंड तफावत असताना बसथांब्यांची झालेली दुरवस्था, रिक्षातळांचे अतिक्रमण, उपक्रमातील घोटाळे, कार्यालयांची दुरवस्था, आगारात विजेअभावी अंधाराचे साम्राज्य या बाबींचा उल्लेख ‘लोकमत’च्या ‘आॅन दी स्पॉट’मध्ये करण्यात आल्यानंतर केडीएमटीचे सभापती भाऊसाहेब चौधरी आणि आयुक्तई. रवींद्रन हे शुक्रवारी संयुक्त दौरा करून दुरवस्थेचा आढावा घेणार होते. त्यात वसंत व्हॅली, गणेशघाट आणि खंबाळपाडा आगारासह डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकातील नियंत्रण कक्ष आणि डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली जाणार होती. परंतु, आयुक्तांना ऐनवेळी मंत्रालयात एका बैठकीसाठी जावे लागल्याने आयुक्तांविना सभापती आणि सदस्यांना दौरा करावा लागला. यावेळी त्यांच्यासमवेत परिवहन व्यवस्थापक देविदास टेकाळे उपस्थित होते. यावेळी दुरवस्थेच्या पार्श्वभूमीवर योग्य ती तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना व्यवस्थापकांना सभापतींनी केल्या.