शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

सूर्या कालवा तोडून बांधकामे

By admin | Updated: July 1, 2016 03:56 IST

बांधकामे उभी केल्याप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्याची मागणी भाजपाचे जिल्हा चिटणीस अनिल शेलार यांनी सूर्या प्रकल्प कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली

शशिकांत ठाकूर,

डहाणू/कासा- सूर्या कालव्यांचे मार्ग तोडून त्या ठिकाणी अतिक्रमण करत बांधकामे उभी केल्याप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्याची मागणी भाजपाचे जिल्हा चिटणीस अनिल शेलार यांनी सूर्या प्रकल्प कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.सूर्या डावा मुख्य कालव्याला जोडणाऱ्या लघु कालव्यांना तोडून तर काही ठिकाणी शेतीला पाणीपुरवठा करणारे लघु कालवे बुजवून तेथे अतिक्रमणे झाली आहेत. त्यामध्ये नानीवली, चरी, वेळगाव, निहे, नागझरी, बोरशेती, वाळवे, गुंदले, वारंगडे मान आदि ठिकाणी कालवे तोडल्याचे निवेदनात नमूद केले असून काही जेसीबीच्या साहयाने लघू कालवे तोडून छोटया मोठया चाऱ्या काढल्याचे म्हटले आहे. यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळत नसून लाखो लिटर पाणी वाया जाते. परिणामी शासनाचे व शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली असून याबाबत डहाणूचे आमदार पास्कल धनारे यांनी लक्ष घालावे असे पत्र आमदारांना दिल्याचे त्यांनी सांगितले. सिंचन हा प्रमुख उद्देश ठेवून गेल्या ४० वर्षापूर्वी कासा जवळील धामणी येथे सूर्या धरण बांधण्यात आले आहे. या धरणाच्या पाण्याद्वारे १४ हजार पाचशे हेक्टर क्षेत्र जमीन ओलिताखाली आणले आहे. डहाणू, पालघर तालुक्यातील सुमारे ७५ ते ८० गावांना या प्रकल्पाद्वारे उन्हाळयात कालव्यातून पाणी पुरवठा केला जातो.> हे कालवे काढताना जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला दिला आहे. व जमीन जलसंपदा विभागाकडे हस्तांतरीत केली आहे. सूर्याच्या पाण्यावर उन्हाळयात शेतकरी मोठया प्रमाणात भातशेती करतात. त्यामुळे आदिवासी भागात उन्हाळयात बाहेरगावी रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी झाले आहे. कालवे तोडून जेथे अतिक्रमणे झाली असतील अशा ठिकाणची माहिती संबंधीत क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून मागविली आहे. त्यामध्ये कोणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. -निलेश दुसाने, कार्यकारी अभियंता