शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुटीविना चालते जिल्हा परिषद शाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2017 01:43 IST

औसा तालुक्यातील भादा जिल्हा परिषद शाळेने गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आरोग्याकडे लक्ष दिले असून, गेल्या १७ महिन्यांपासून ही शाळा सुटीविना सुरू आहे

आशपाक पठाण । लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : औसा तालुक्यातील भादा जिल्हा परिषद शाळेने गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आरोग्याकडे लक्ष दिले असून, गेल्या १७ महिन्यांपासून ही शाळा सुटीविना सुरू आहे. पहाटे ५.३० वाजेपासूनच विद्यार्थ्यांच्या दिनचर्येला प्रारंभ होतो.इंग्रजी शाळांचे ग्रामीण भागात आव्हान असतानाही औसा तालुक्यातील भादा जिल्हा परिषद शाळेने गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे या शाळेत आजही जवळपास ६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुख्याध्यापक कवी भारत सातपुते हे ११ जानेवारी २०१६ रोजी भादा जिल्हा परिषद शाळेत रुजू झाल्यापासून त्यांनी सुटीविना शाळा सुरू केली. त्यांच्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसादही भरभरून आहे.शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर व्यायाम, योगासन, मल्लखांब, कुस्ती आदींचे धडेही विद्यार्थ्यांना दिले जातात. पहाटे ५.३० वाजता शाळेच्या प्रांगणात जमलेल्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सातपुते हे मार्गदर्शन करतात. जवळपास एक तास विद्यार्थी योगासन व व्यायामासाठी देतात. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ झाले असून, आजारांपासून बचाव झाल्याचे पालकांचे म्हणणे आहे. व्यायामाची वाढली गोडीशाळेतील मुला-मुलींमध्ये व्यायामाची गोडी वाढली आहे. त्यामुळे भल्या पहाटे बहुतांश विद्यार्थी शाळेत हजर असतात. याशिवाय मुलींसाठी गावात ६ ठिकाणी सुविधा करण्यात आली आहे. या ठिकाणीही मुलींची संख्या लक्षणीय आहे.