शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

पर्जन्यहानीची सवरांकडून पाहणी

By admin | Updated: September 24, 2016 03:13 IST

बोईसर व तारापूर येथील विविध भागाला व रुंद झालेल्या नाल्याला पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी पाहणी केली.

बोईसर : मंगळवारी अतिवृष्टीमुळे आलेल्या पाण्याच्या पूरात नुकसान झालेल्या बोईसर व तारापूर येथील विविध भागाला व रुंद झालेल्या नाल्याला पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी पाहणी केली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना पालकमंत्र्यांनी सांगितले की नुकसानीचा पूर्ण अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन निश्चित मदत किती द्यायची या बाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल.पालकमंत्री सवरा यांनी आज बोईसर येथील सिडको कॉलनी व भीमनगर तर तारापूर येथे संत रोहिदासनगर व मुस्लीम मोहल्ल्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यावेळी पालघरचे खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगा, डहाणूचे आमदार पास्कल धनारे, पालघरचे तहसिलदार महेश सागर, पालघर जि.प. चे कृषी सभापती अशोक वडे, जिल्हा परीषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रा.पं. सदस्य व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. सिडको कॉलनीतील पूरग्रस्तांनी मंत्र्यांकडे रिडेव्हलपमेंटची मागणी करून नाल्यावरील अतिक्रमणे हटवून नाले रुंदीकरणाची मागणी केली तर भीमनगर येथील पूरग्रस्तांना पालकमंत्री न भेटताच फक्त नाल्याची पाहणी करून निघून गेल्याने तेथील नागरीकांनी नाराजी व्यक्त केली. तर अतिवृष्टीला तीन दिवस उलटूनही मदत न मिळाल्याने पूरग्रस्त मदतीच्या प्रतिक्षेत असून आम्हाला तुटपूंजी मदत नको परीपूर्ण मदत द्या अशी मागणी जोर धरत आहे.दरम्यान, गुरुवारी पदवीधर शिक्षक मतदार संघाचे आमदार कपिल पाटील यांनी भीमनगर तर पालघरचे आमदार अमित घोडा यांनी पास्थळ व तारापूरच्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र बोईसरचे आमदार विलास तरे अजून बोईसरला फिरकलेच नाहीत. (वार्ताहर)>भरपाई द्या पूरग्रस्त घरांची संख्या वाढणारबोईसर व तारापूर मंडळ (महसूली) क्षेत्रामध्ये एकूण १४७३ घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्य्रग्रस्त घरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पूरामध्ये अन्न-धान्य, कपडेलत्ते, चादरी बिछाने व इलेक्ट्रीक तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह अनेक घरगुती वापरांच्या वस्तूंचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून आम्हाला पूर्ण नुकसान भरपाई त्वरीत द्या, अशी मागणी पूरग्रस्तांकडून होत आहे. तर गोरगरीबांचे अन्नधान्य भिजल्याने त्यांच्यावर संकटाचा डोंगरच कोसळला आहे.>‘चहा नको रे... नाहीतर पत्रकार म्हणतील पालकमंत्री चहात गुंतले’ बोईसर येथील दौऱ्यात सिडको कॉलनी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर बोईसरच्या भाजपाच्या एका पदाधिकाऱ्यांनी चहाची विनंती केल्यानंतर पालकमंत्री विष्णू सवरा यांनी मिश्किलपणे केले व्यक्तव्य.