पुणे : ज्या शेतकऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत तूर खरेदी केंद्रावर आणून दिली होती, त्यांची सर्व तूर सरकार खरेदी करणार आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांच्या नावे मोठ्या प्रमाणावर तूर खरेदी झाली त्यांच्या शेताची सॅटेलाईटद्वारे इमेज तपासून त्यांनी तेवढा पेरा केला होता का? याची शहानिशा करणार असल्याचे अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. बापट म्हणाले, राज्यामध्ये शेकडो खरेदी केंद्र आहेत. कोणत्या केंद्रांवर किती तूर जमा झाली याचा आकडा संकलित करण्याचे काम सुरु आहे. पणनमंत्री हा आकडा जाहीर करतील. जिल्हाधिकाऱ्यांना बारदाने खरेदी करण्याचे अधिकार आहेत.
तूर शेतीची सॅटेलाईटद्वारे पाहणी
By admin | Updated: May 1, 2017 04:16 IST