शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटीशकालीन कळवा पुलाचे सर्वेक्षण सुरु

By admin | Updated: June 12, 2014 04:22 IST

ठाणे आणि कळव्याला जोडणाऱ्या कळवा खाडीवर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलाचा सर्व्हे करण्याचे काम ठाणे महापालिकेने हाती घेतले आहे.

ठाणे : ठाणे आणि कळव्याला जोडणाऱ्या कळवा खाडीवर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलाचा सर्व्हे करण्याचे काम ठाणे महापालिकेने हाती घेतले आहे. दोन आठवडे हा सर्व्हे सुरू राहणार असून, त्यानंतर हा पूल वाहतुकीस योग्य आहे अथवा नाही याचा अहवाल सादर होणार आहे. त्यानंतरच या पुलावरून चारचाकी वाहनांना प्रवेश द्यायचा अथवा नाही, हेसुद्धा स्पष्ट होणार असल्याचे पालिकेने म्हटले.कळव्याला ठाण्याशी जोडण्यासाठी सुमारे दीडशे वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी या पुलाची निर्मिती केली होती. दगडांचा वापर करून हा पूल उभारण्यात आला आहे. परंतु दीड वर्षापूर्वी या पुलाच्या बुरुजाचे काही दगड निखळू लागल्याने तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. त्यानंतर, या पुलाला काहीशी डागडुजी करून हा पूल वाहतुकीस योग्य आहे अथवा नाही, याची शहानिशा केल्यानंतर त्या ठिकाणावरून दुचाकी आणि तीनचाकी अशा हलक्या वाहनांना प्रवेश खुला करण्यात आला आहे. आता महापालिकेने या पुलाचा सर्व्हे करण्याचे काम हाती घेतले आहे. बुधवारपासून या कामाला सुरुवात झाली असून यासाठी दिल्ली मेड कंपनी आणि आयआयटी रोडकी यांच्या माध्यमातून या पुलाच्या खालच्या बाजूस सेन्सर बसवण्यात आले आहेत. यासाठी परदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या सेन्सरमध्ये या पुलावरून चारचाकी वाहने जाऊ शकतात का, याचा अभ्यास केला जाणार आहे. यासाठी दुपारच्या वेळेस चारचाकी वाहनांना या पुलावरून प्रवेश दिला जाणार आहे. तसेच दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचाही अभ्यास केला जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. दोन आठवड्यांनंतर या पुलाची वाहन क्षमता लक्षात घेतली जाणार आहे. त्यानंतर, चारचाकी वाहनांसाठी हा पूल सक्षम आहे का, याचा अहवाल दिला जाणार आहे. या अहवालातून हा पूल वापरास योग्य आहे अथवा नाही, याची माहिती समोर येईल. (वार्ताहर)