शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नऊ जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

By admin | Updated: February 15, 2016 04:03 IST

डीव्हीसी तसेच दोन सेक्शन कमांडरसह एकूण ४६ लाखांचे बक्षीस असलेल्या नऊ जहाल नक्षल्यांनी अलीकडेच गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.

गडचिरोली : डीव्हीसी तसेच दोन सेक्शन कमांडरसह एकूण ४६ लाखांचे बक्षीस असलेल्या नऊ जहाल नक्षल्यांनी अलीकडेच गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. यामुळे नक्षल चळवळीला जबर हादरा बसला आहे. शासनाच्या आत्मसमर्पण योजनेला नक्षल्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून, २०१५मध्ये ५६, तर २०१६च्या दीड महिन्यात १२ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये १६ लाखांचे बक्षीस असलेला व नक्षल्यांच्या कसनसूर विभागीय समितीचा सदस्य (डीव्हीसी) सुनील ऊर्फ रामजी सुनसी मट्टामी, कंपनी क्रमांक ४ चा सेक्शन कमांडर शिवा ऊर्फ सत्तू ऊर्फ भिमा राजू नरोटे व त्याची पत्नी राखी ऊर्फ रेखा तिम्मा (प्रत्येकी आठ लाखांचे बक्षीस), कंपनी क्र.१० ची सदस्य मीरा देवू नरोटे, टिप्पागड दलम सदस्य कमला ऊर्फ रम्मी बाजीराव हिडको, गट्टा दलम सदस्य सोमजी ऊर्फ लेबू मोडी आतलामी, कसनसूर दलम सदस्य लक्ष्मण ऊर्फ लालू सोमा नरोटे, गट्टा दलम सदस्य दोडगे दुगे आत्राम, मंगू ऊर्फ रामजह आंदरु मट्टामी यांचा समावेश आहे. परिसरातील १७ चकमकी, १४ जाळपोळी व ९ हत्या प्रकरणात सुनीलचा सहभाग होता. शिवा नरोटे ११ गुन्ह्यांत सहभागी होता. राखी तिम्मा हिने ९ गुन्हे केले आहेत, तर मीरा नरोटे ही दोन गुन्ह्यांमध्ये सहभागी होती. टिप्पागड दलम सदस्य असलेली कमला हिडको ही उत्तर गडचिरोलीतील नक्षल्यांच्या जनताना सरकारचा प्रमुख सावजी याची पत्नी आहे. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कमलाने चोवीस तासांच्या आतच आत्मसमर्पण केल्याची माहिती संदीप पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)