शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सुरेशदादांवरील कारवाई आकसाने

By admin | Updated: March 18, 2016 02:24 IST

जळगावचे नेते सुरेशदादा जैन हे आज चार वर्षे उलटली तरी तुरुंगात आहेत. त्यांना साधा जामीन मिळू शकत नाही. त्यांच्या अटकेची कारवाई आकसापोटी करण्यात आली नव्हती का, असा

मुंबई : जळगावचे नेते सुरेशदादा जैन हे आज चार वर्षे उलटली तरी तुरुंगात आहेत. त्यांना साधा जामीन मिळू शकत नाही. त्यांच्या अटकेची कारवाई आकसापोटी करण्यात आली नव्हती का, असा सवाल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला. मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि महाजन यांच्या वार्तालापाचा एकत्रित कार्यक्रम आयोजित केला होता. छगन भुजबळ यांना सरकारने सूडबुद्धीने अटक केली, असा विरोधकांचा आरोप आहे. याकडे लक्ष वेधले असता मंत्री महाजन म्हणाले, आमच्या जळगावचे मोठे नेते सुरेशदादा जैन हे आज चार वर्षे उलटली तरी तुरुंगात आहेत त्याचे काय? हा त्यांच्यावर अन्याय नाही का, असा सवाल महाजन यांनी केला.सुरेशदादांवरील अन्यायाविरुद्ध आपण मुख्यमंत्री असताना आम्ही आपल्याकडे आलो होतो, अशी आठवणही महाजन यांनी चव्हाण यांना करून दिली. भुजबळांना अटक करण्याचे कोणतेही कारण नव्हते. तरीही ही राजकीय अटक झाल्याचे जे मत जयंत पाटील यांनी सभागृहात मांडले त्याच्याशी सहमत असल्याचे चव्हाण या वार्तालाप कार्यक्रमात म्हणाले. त्यावर, महाजन यांनी सुरेशदादांच्या अटकेचा विषय काढला. ते म्हणाले, सुरेशदादांनी तर कुठे साधी सही केली नव्हती, ते कुठच्या संबंधित पदावर नव्हते, तरीही त्यांना अटक झाली. ७० लोकांना पकडले होते, त्यातील ६९ बाहेर आले आहेत. पण सुरेशदादा अजून आतच आहेत. जैन यांच्यावर तुरुंगात असताना बायपास करावी लागली. ते आता ७३ वर्षांचे आहेत. पण तरीही त्यांना जामीन मिळत नाही. तत्कालीन सरकार त्यांच्याविषयी आकसाने वागले, असे महाजन यांनी चव्हाण यांना ऐकवले. (विशेष प्रतिनिधी)