शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

गटबाजी विसरली म्हणून सुर्डी जिंकली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 20:47 IST

विक्रमी लोकसहभागाचं योगदान: राज्यात प्रथम येण्याच्या ध्येयानंच केली जलसंधारणाची कामे

ठळक मुद्देसुर्डी गाव तसं पूर्वीपासूनच सधन व बागायती म्हणून ओळखगावाच्या शिवारात २५ टक्के डोंगराळ भाग. मात्र उन्हाळ्यात दरवर्षी विहिरी तळ गाठायच्यापंचेचाळीस दिवस चाललेल्या या स्पर्धेत दररोज अडीच हजारांहून अधिक गावकºयांनी श्रमदान केले

शहाजी फुरडे-पाटील 

बार्शी: सुर्डी गाव तसं पूर्वीपासूनच सधन व बागायती म्हणून ओळख... गावाच्या शिवारात २५ टक्के डोंगराळ भाग. मात्र उन्हाळ्यात दरवर्षी विहिरी तळ गाठायच्या. हा नेहमीचाच अनुभव. परंतु यावर्षी उन्हाळ्यातदेखील गावातील विहिरी पाण्याने डबडबल्या पाहिजेत, असा गावकºयांनी ठाम निर्धार करीत पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला. पंचेचाळीस दिवस चाललेल्या या स्पर्धेत दररोज अडीच हजारांहून अधिक गावकºयांनी श्रमदान करत राज्यात नंबर आणायचाच या उद्देशाने जिद्दीला पेटून काम केले़ हे करीत असताना मनसंधारण, मृदसंधारण, जलसंधारण, वृक्षारोपण आदी गुणवत्तेची कामे करुन विक्रमी लोकसहभाग मिळविला़ त्याचेच फलित गावाचा राज्यात पहिला क्रमांक आला़ या पहिल्या क्रमांकाच्या उत्तेजनाने गावकºयांनी अक्षरश: दिवाळी साजरी केली़ 

तालुक्यातील वैराग भागातील सुर्डी हे ३ हजार ३७७ लोकवस्तीचे गाव. गावामध्ये ७५७ कुटुंबं राहतात. गावाचे क्षेत्र २ हजार ३७४ हेक्टर असून, खातेदारांची संख्या १ हजार ५७० आहे. यापैकी रब्बीचे क्षेत्र ८१० हेक्टर तर उर्वरित क्षेत्र खरीप व बागायती आहे. यावर्षी पाणी फाउंडेशनचे नितीन आतकरे गावात आले व त्यांनी या स्पर्धेचे महत्त्व पटवून दिले. त्यानुसार मधुकर डोईफोडे यांच्या नेतृत्वाखाली सहा जणांची टीम पाणी फाउंडेशनचे तांत्रिक प्रशिक्षण पूर्ण करुन आली. त्यानंतर सहा जणांच्या तीन टीम पाठवून अठरा जणांनी प्रशिक्षण घेतले़ पुढे गावातील सर्व राजकीय गटांच्या व्यक्तींना एकत्रित बोलावून सव्वा महिना त्यांचे मनसंधारण केले. प्रोजेक्टरच्या सहाय्याने वाड्यावस्त्यांवर जलसाक्षरता केली. दररोज २० ते २५ किलोमीटर शिवारफेरी केली. साहित्य खरेदी करुन निधी संकलनाला सुरुवात करुन यंदा वॉटर कप स्पर्धेत भाग घेऊन गावाला पाणीदार करावयाचे, असा निर्णय झाला.

८ एप्रिलला श्रमदानाचे काम करण्यासाठी तब्बल ७९० नागरिक जमा झाले. दुसºया दिवशी ही संख्या १ हजार व पुढे १३०० वर गेली. पुढे हा आकडा वाढत जाऊन दोन ते अडीच हजारांवर स्थिरावला़ एका दिवशी तर तब्बल तीन हजार लोक श्रमदानाच्या कामावर होते़२०० पेक्षा जास्त कुटुंबांची कामांवर हजेरी होती़ लहान मुलांपासून ७५ वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा सहभाग होता़ 

 स्पर्धेच्या कालावधीत सुर्डीकरांनी श्रमदानातून म्हणजे मनुष्यबळातून १७५०० घ़ मी़ काम करणे गरजेचे असताना २२ हजार घ़ मी़ काम, मशीनच्या सहाय्याने २ लाख ५२ हजार ४०० मीटरऐवजी ३ लाख घ़ मी़ काम केले़ यात १४ कि़ मी़ लांबीचे डी़प़ीसी़टी़टी़ मशीनच्या सहाय्याने, ३२ हजार घ़़मी़ कंपार्टमेंट बंडिंग, २७ इनलेट-आऊटलेट शेततळी,२७ हजार घ़ मी़ (३ कि़मी़) ओढा खोलीकरण, दगडी पिंचिंग, ५ विहिरी पुनर्भरण, ७०० जलशोषक चर, १६०० वृक्षारोपण, ६१२ शोषखड्डे गावात घेतले. त्यामुळे उन्हाळ्यात हातपंपाला पाणी वाढले़ माथा ते पायथा हे जलसंधारणाचे सर्व उपचार या स्पर्धा कालावधीत केले़ कित्येक वर्षे जाता येत नव्हते असे रस्ते खुले केले़ विद्यार्थ्यांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबवून गाव स्वच्छ केले़ त्यामुळेच हे गाव आज राज्यात प्रथम आले़

सर्वांचा सहभाग - गावातील ७५ पेक्षा जास्त वयाच्या महिलांनी नाश्त्याचे व स्वयंपाकाचे काम केले तर ज्येष्ठ नागरिकांनी पाणी वाटपाचे आणि लहान मुलांनी दगडगोटे गोळा करण्याचे काम मनोभावे केले़ दररोजचा नाश्ता देण्यासाठी गावकºयांची चढाओढ होती़त्यासाठी चिठ्ठी काढून नाश्ता खाऊ घालण्याचा मान दिला होता़ श्रमदानाचे काम गावापासून लांब असल्याने गावातील १२ वाहनमालकांनी मोफत ने-आण करण्यासाठी वाहने दिली. दररोज सकाळी ६ ते ८ या वेळेत हॉटेल, सलून व इतर व्यवसाय बंद ठेवले जातात. तात्यासाहेब शेळके हे एक पाय नसलेले व प्रकाश डोईफोडे हे एक हात नसलेले नागरिकही दररोज श्रमदान करण्यासाठी येऊन काम करणाºयांचा उत्साह वाढवत होते. या सर्व कामांत महिलांचा सहभागही मोठा होता़ यात माणसांना कामांवर बोलावणारी, कामांची मोजमापे व मशीनवर्क , स्पिकरद्वारे बोलावणी अशा वेगवेगळ्या टीमला कामे वाटून दिली होती़ या सर्वांवर प्रशिक्षण घेतलेली टीम कामांच्या गुणवत्तेकडे लक्ष देत होती़ सुर्डीकरांनी मनावर घेऊन हे काम चालू केल्याने गावात खºया अर्थाने तुफान आलंया असे चित्र निर्माण झाले होते़

यांनी केले सहकार्य - या कामांसाठी बालाजी अमाईन्स सोलापूर ११० तास पोकलेन मशीन, स्नेहालय अहमदनगर यांची एक लाखाची ईश्वरी चिठ्ठी, अनिवासी सुर्डीकरांची पाच लाखांची मदत, विक्रीकर उपायुक्त प्रकाश शेळके यांचीही भरीव आर्थिक मदत, गावातील माध्यमिक, प्राथमिक शिक्षक, इतर नोकरदार यांनी ठरवून दिलेली रक्कम दिली़ शिवाय गावकºयांनी सर्वच बाबतीत सहभाग नोंदवला़ 

४३ लाखांचा लोकसहभाग - या कालावधीत अन्नदानावर लोकसहभागातून साडेतीन लाख रुपये खर्च झाले़ ४३ लाख रुपये लोकवर्गणी जमा झाली़ महिलांनी त्यांच्याकडे जमा झालेले २५ हजार दिले़ रोजचे वाढदिवस,पुण्यतिथी कामावर साजरी केली गेली़ आचारी सेवा, वाहन सेवा, गॅस ,पाणी आदी सेवा गावकºयांनी मोफत दिल्या़ 

यांनी दिल्या भेटी, विक्रमी गर्दीची ग्रामसभा - गावातील ग्रामसभा या विक्रमी गर्दीच्या झाल्या़ पोपटराव पवार,कृषी अधिकारी डी़एल़ मोहिते व जलसंधारण तज्ज्ञ हरीश डावरे यांच्या टीमने गावाची पाहणी केली़ त्यादिवशीच्या ग्रामसभेला तब्बल तीन हजार लोक उपस्थित होते़ डॉ़ अविनाश पौळ यांनीही गावाला भेट दिली होती़ 

टॅग्स :SolapurसोलापूरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा