शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यकिरणे अंबाबाईच्या गुडघ्यांपर्यंत!

By admin | Updated: November 10, 2016 05:31 IST

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात बुधवारपासून किरणोत्सव सोहळ्यास प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी सूर्यकिरणांनी देवीच्या गुडघ्यांना स्पर्श केला.

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात बुधवारपासून किरणोत्सव सोहळ्यास प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी सूर्यकिरणांनी देवीच्या गुडघ्यांना स्पर्श केला. त्यामुळे आज, गुरुवारी होणाऱ्या किरणोत्सव सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी किरणे कंबरेच्या वरपर्यंत पोहोचण्याची आशा निर्माण झाली आहे. भारतीय प्रगत स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून अंबाबाई देवीच्या मंदिराकडे पाहिले जाते. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या या हेमांडपंथी मंदिरात वर्षातून दोन वेळा किरणोत्सव सोहळा होता. यामध्ये दक्षिणायन व उत्तरायण असे दोन किरणोत्सव होतात. त्यापैकी दक्षिणायन किरणोत्सव सोहळ्यास प्रारंभ झाला. सूर्यकिरणांची तीव्रता चांगली होती. त्यामुळे किरणांनी सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी अंबामातेच्या गुडघ्यांपर्यंत स्पर्श केला. या किरणोत्सवात डाव्या बाजूच्या दोन इमारतींवरील जिन्याच्या टोप्या या किरणांमध्ये अडथळा ठरल्या. त्यामुळे बुधवारी पहिल्याच दिवशी किरणांना देवीच्या कंबरेपर्यंत पोहोचण्यात अडथळा आला. याशिवाय हिवाळ्यातील दव, धुलीकणांचाही यात अडथळा ठरला. हा सोहळा सुमारे ४९ मिनिटांचा ठरला. (प्रतिनिधी) किरणांची तीव्रता चांगली असूनही ती टिकली नाहीत. कारण यामध्ये महाद्वार दरवाजाकडील डाव्या बाजूच्या मिणचेकर, आगळगावकर यांच्या इमारतींवरील जिने, टेरेसवरील टोपी यांचा अडथळा आला. हे अडथळे महापालिकेकडून दूर झाले, तर किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होईल. - उदय गायकवाड, पर्यावरणतज्ज्ञ, कोल्हापूर किरणांची तीव्रता चांगली होती; परंतु ती कमी झाली. इमारतींचे अडथळे दूर झाले तर पूर्ण क्षमतेने किरणोत्सव होईल. त्यात दव, धुलीकणांचाही समावेश आहे. अडथळा नसता तर पहिल्याच दिवशी किरणे देवीच्या कंबरेपर्यंत पोहोचली असती. -प्रा. किशोर हिरासकर, किरणोत्सव अभ्यासक, कोल्हापूर करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दक्षिणायन किरणोत्सव सोहळ्यास बुधवारी प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी किरणे देवीच्या गुडघ्यांपर्यंत पोहोचली.