शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सूरज परमार आत्महत्या प्रकरण, चारही नगरसेवकांना अटकपूर्व जामीन

By admin | Updated: November 3, 2015 14:05 IST

ठाण्यातील बिल्डर सूरज परमार आत्महत्याप्रकरणी गोत्यात आलेल्या चारही नगरसेवकांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३ - ठाण्यातील बिल्डर सूरज परमार आत्महत्याप्रकरणी गोत्यात आलेल्या चारही नगरसेवकांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. विक्रांत चव्हाण, सुधाकर चव्हाण, नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे या चौघांना हायकोर्टाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर २ डिसेंबरपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. 

ठाण्यातील बिल्डर आणि कॉसमॉस समुहाचे प्रमूख सूरज परमार यांनी महिनाभरापूर्वी आत्महत्या केली होती. परमार यांच्या सूसाइड नोटमध्ये ठाण्यातील चौघा नगरसेवकांचे नाव होते.  राजकीय नेत्यांना पैसे दिले, तरी कामे होत नव्हती, असा उल्लेखही त्यांच्या नोटमध्ये करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी नोटमध्ये उल्लेख असलेल्या चौघा नगरसेवकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून हे चौघेही नगरसेवक पसार होते. 

जिल्हा सत्र न्यायालयाने चारही नगरसेवकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर चौघांनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मंगळवारी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने चौघांनाही जामीन मंजूर केला. कोर्टाने काही अटीदेखील टाकल्या असून यानुसार चौघांनाही वर्तकनगर पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. तसेच पासपोर्ट आणि मोबाईल फोनही कोर्टात जमा करावा लागणार असून २ डिसेंबरपर्यंत त्यांना महापालिका आवारात प्रवेश करण्यास बंदी टाकण्यात आली आहे.