शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार वितरण सोहळा आज

By admin | Updated: March 22, 2015 01:33 IST

संगीतसाधक श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त प्रदान करण्यात येणारा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा आज, रविवार दि. २२ मार्च रोजी प्रदान करण्यात येतील

चिटणीस पार्कमध्ये भव्य कार्यक्रम : हरिहरन यांच्या सोल इंडिया बँडचे विशेष सादरीकरणनागपूर : लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आणि लोकमत सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त प्रदान करण्यात येणारा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा आज, रविवार दि. २२ मार्च रोजी नागपुरातील चिटणीस पार्क, महाल येथे नवोदित प्रतिभावंतांना प्रदान करण्यात येतील. या पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून हा कार्यक्रम सायंकाळी ५.३० वाजता होईल. हा पुरस्कार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. या कार्यक्रमात हरिहरन आणि त्यांच्या सोल इंडिया बँडचे कलावंत संगीतसंध्या सादर करून ही सायंकाळ अविस्मरणीय करणार आहेत. त्यात चित्रपट अभिनेता जॉन अब्राहम यांची उपस्थिती युवावर्गासाठी खास आकर्षण असणार आहे. श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांनी महाराष्ट्र आणि गोवा येथे सखी मंचची स्थापना करून सखी अभियानाची मुहूर्तमेढ रोवली. या अभियानात २.५ लाखापेक्षा अधिक कुटुंब लोकमतशी जुळले आहेत. त्यांनी महिलांच्या सशक्तीकरणाचे यशस्वी प्रयत्न केले. यातून महिलांना स्वयंरोजगार आणि आत्मविश्वास मिळाला. त्यांच्या जगण्याला एक दिशा देण्यात ज्योत्स्ना दर्डा यांचे योगदान मोठे आहे. नागपुरात जवाहरलाल दर्डा संगीत कला अकादमीची स्थापना करून त्यांनी संगीताचा प्रवाह सहजपणे सखींच्या आयुष्यात आणला. त्यांनी आयुष्यभर स्वरांची साधना केली. संगीतावर असणारे त्यांचे विलक्षण प्रेम आणि त्यांची संगीत साधना लक्षात घेत त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मागील वर्षी सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराला प्रारंभ करण्यात आला. या पुरस्कारासाठी संगीत क्षेत्रातील मातब्बर संगीतकार नवोदित गायकांची निवड करतात. यंदा राष्ट्रीय स्तरावर स्वत:च्या कला कौशल्याने आपली मुद्रा उमटविणाऱ्या दोन प्रतिभावंतांना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपयांचा निधी पारितोषिकादाखल प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार मिळविणाऱ्या प्रतिभावंतांची नावे कार्यक्रमात जाहीर करण्यात येतील. यंदाच्या निवड समितीत चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता सुभाष घई, पार्श्वगायक व संगीतकार शंकर महादेवन, गायक रूपकुमार राठोड, गायिका शुभा मुद्गल, शशी व्यास आणि लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय ऊर्जा व कोळसा मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहिर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल, खासदार अजय संचेती, खासदार कृपाल तुमाने, राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, उद्योग व खनन, पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे, आदिवासी विकास राज्यमंत्री अंबरीश आत्राम, राजस्व राज्यमंत्री संजय राठोड, आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त गायक व संगीतकार हरिहरन, चित्रपट अभिनेता जॉन अब्राहम, विशिष्ट शैलीदार गायनासाठी प्रसिद्ध असलेले गायक रूपकुमार राठोड आणि गायिका सोनाली राठोड उपस्थित राहतील.