शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रिया सुळेंचे टीकेचे बाण केसरकरांच्या जिव्हारी, टीकेनंतर दीपक केसरकर थेट शरद पवारांच्या दारी

By अनंत खं.जाधव | Updated: October 28, 2023 20:51 IST

Deepak Kesarkar-Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर याच्या सावंतवाडी मतदारसंघात येऊन टिकेचे बाण सोडल्यानंतर अवघ्या 24 तासात मंत्री केसरकर यांनी राष्ट्रवादी चे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने अनेकांच्या  भुवया उंचावल्या आहेत.

- अनंत जाधवसावंतवाडी - राष्ट्रवादी काँग्रेस च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर याच्या सावंतवाडी मतदारसंघात येऊन टिकेचे बाण सोडल्यानंतर अवघ्या 24 तासात मंत्री केसरकर यांनी राष्ट्रवादी चे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने अनेकांच्या  भुवया उंचावल्या आहेत.खासदार सुळे यांनी शाळा बंद बार सुरू अशी टिका केली होती. हि टिका मंत्री केसरकर यांना जिव्हारी लागली असून त्यामुळेच ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे.या भेटीचा फोटो पवार यांनी स्वता टिव्ट केल्याने सर्वानाच आर्शचयाचा धक्काच बसला आहे.

खासदार सुप्रिया सुळे या शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या.या दौऱ्यात त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर याच्या मतदारसंघातील दोडामार्ग तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा मेळावा घेतला या मेळाव्यातून त्यांनी थेट मंत्री केसरकर सांभाळत असलेल्या शालेय शिक्षण विभागांच्या कारभारावरच बोट ठेवले होते. महाराष्ट्रात शाळा बंद आणि बार सुरू अशी परिस्थीती असल्याचे सांगत केसरकर हळू बोलून लोकांना भुरळ घालतात अशी टिपण्णी करतानाच शरद पवार व बाळासाहेब ठाकरे यांचे झाले नाही ते एकनाथ शिंदे चे काय होणार असे म्हणत सुळेनी केसरकर याच्यावर थेट हल्ला चढवला होता.

खासदार सुळे यांच्या टिके नंतर मंत्री केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत संतप्त प्रतिकिया दिली होती.व एक शाळा बंद केली असेल तर दाखवून द्या असे म्हणत मी लवकरच शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले होते.तसेच ते पवार माझे राजकीय गुरू असल्याचा उल्लेखही त्यांनी केला होता.त्यातच मुंबई येथील महिला मेळाव्यात मध्यंतरी शरद पवार यांनीही शिक्षण खात्यातील कामावर नाराजी व्यक्त केली होती.तसेच महिलांनी आंदोलन करावे अशी सुचना केली होती.

या सर्व घटनांच्या पाश्र्वभूमीवर मंत्री केसरकर यांनी शनिवारी मुंबई येथे शरद पवार यांची भेट घेतली आहे.महत्वाचे म्हणजे या भेटीनंतर स्वता शरद पवार यांनी टिव्ट करत भेट सार्वजनिक केल्याने सर्वानाच आर्शचयाचा धक्काच बसला आहे.मात्र या भेटीत काय घडले हे मात्र अद्याप समोर आले नाही.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Supriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवार