शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांच्या खिशाला कात्री, मेट्रो दरवाढीला सुप्रीम कोर्टाची मान्यता

By admin | Updated: August 7, 2015 13:21 IST

मुंबई मेट्रोच्या दरवाढीच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिल्याने येत्या नोव्हेंबरपासून मुंबईकरांच्या खिशाला चाट बसणार आहे. यामुळे वर्सोवा-घाटकोपर प्रवासासाठी १० ते ११० रुपये मोजावे लागतील.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - मुंबई मेट्रोच्या दरवाढीच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिल्याने येत्या नोव्हेंबरपासून मुंबईकरांच्या खिशाला चाट बसणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे वर्सोवा-घाटकोपर या प्रवासासाठी १० ते ११० रुपयांपर्यंत तिकीट ठेवण्यास परवानगी मिळाली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे एमएमआरडीए व राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत सध्याचे दर लागू असून त्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून मेट्रोच्या तिकीटाचे दर वाढतील. 
 
मेट्रोच्या तिकिटाचे दर वाढविण्यावरून रिलायन्स इन्फ्रा आणि एमएमआरडीएमध्ये वाद झाला होता. अखेर एमएमआरडीएने मुंबई उच्च न्यायालयात दरवाढीविरोधात आव्हान दिले होते. परंतु न्यायालयाने एमएमआरडीएची याचिका फेटाळून लावल्याने रिलायन्सने गतवर्षी जुलैमध्ये तिकिटाचे दर वाढविले. सध्या मेट्रोचे किमान तिकीट १0 रुपये आणि कमाल तिकीट ४0 रुपये आहे. रिलायन्सने पुन्हा तिकीट दरवाढीचा प्रयत्न केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दरनिश्चिती समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार केंद्राने मद्रास उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ई. पद्मनाथन यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल मुंबई मेट्रो वन प्रा. लि. (एमएमओपीएल)कडे सादर केला. या समितीने किमान १0 ते कमाल ११0 रुपयांपर्यंत भाडेवाढीस हिरवा कंदील दाखवला होता. त्यानंतर झालेल्या बैठकीनंतर रिलायन्सने पुढील तीन महिने तरी हे दर न वाढवण्याचा निर्णय स्पष्ट केला होता. ज्यामुळे ऑक्टोबर अखेरीपर्यंत तरी मेट्रोचे तिकीट किमान १० रुपये तर कमाल ४० रुपये इतकेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले होते.
मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने दरवाढीला हिरवा कंदिल दाखवल्यानंतर मेट्रोने तीन महिन्यांनंतरचे प्रस्तावित तिकीटदर आपल्या संकेतस्थळावर जाहीर केले आहेत.