शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

वन विभाग सचिवांना उच्च न्यायालयाने बजावला समन्स

By admin | Updated: July 7, 2016 19:22 IST

मनसर ते खवासा रोडचे चौपदरीकरण करण्यासाठी कापण्यात आलेल्या झाडांच्या मोबदल्यात नवीन झाडे लावण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने वन विभागाला ७ कोटी ६८ लाख रुपये दिले आहेत.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. ७ : मनसर ते खवासा रोडचे चौपदरीकरण करण्यासाठी कापण्यात आलेल्या झाडांच्या मोबदल्यात नवीन झाडे लावण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने वन विभागाला ७ कोटी ६८ लाख रुपये दिले आहेत. वन विभागाने उमरेड येथे १ लाख झाडे लावण्याची ग्वाही जुलै-२०१५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली होती. परंतु, गेल्या वर्षभरात एकही झाड लावण्यात आले नाही. यामुळे न्यायालयाने गुरुवारी शासनाची कानउघाडणी करून वन विभागाचे मुख्य सचिव व प्रधान मुख्य वन संवर्धक यांना समन्स बजावला. दोन्ही अधिकाऱ्यांना पुढच्या गुरुवारी (१४ जुलै) न्यायालयात उपस्थित राहून यावर स्पष्टीकरण सादर करायचे आहे.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सुरुवातीला मनसर ते खवासा रोडवर प्राण्यांच्या सुरक्षेसाठी करावयाच्या ह्यमिटिगेशन मेजर्सह्णवर चर्चा झाली. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्युट आॅफ इंडिया (डब्ल्यूआयआय) व नॅशनल टायगर कन्झर्वेशन आॅथोरिटी (एनटीसीए) या आपापल्या क्षेत्रातील सर्वोच्च संस्थांच्या तज्ज्ञांनी सखोल अभ्यास व आंतरराष्ट्रीय अहवाल पडताळून ह्यमिटिगेशन मेजर्सह्ण दिले आहेत. त्यानुसार महामार्ग प्राधिकरणला या रोडवर ७५०, ३००, १००, ८०, ६५, ६० व ५० मिटरचे ह्यअंडरपासेसह्ण बांधायचे आहेत. हे अंडरपासेस योग्य ठिकाणी बांधण्यात येत नसल्याचा आरोप वन विभागाने केला. महामार्ग प्राधिकरणने हा आरोप खोडून काढला. परिणामी न्यायालयाने दोन्ही पक्षाच्या अधिकाऱ्यांना ह्यमिटिगेशन मेजर्सह्णचे संयुक्तपणे निरीक्षण करण्याचे निर्देश दिलेत. यानंतर न्यायालयाने वृक्षारोपणावरून वन विभागाची कानउघाडणी केली. यासंदर्भात न्यायालयाने स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे.