शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘दहशतवादाला मिळणारे पाठबळ कमी होणार’

By admin | Updated: November 16, 2016 06:00 IST

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे पाकिस्तान स्पॉन्सर दहशतवाद आणि फेक करन्सीला आळा बसून दहशतवादाला मिळणारे पाठबळ निश्चितच कमी होईल

मुंबई : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे पाकिस्तान स्पॉन्सर दहशतवाद आणि फेक करन्सीला आळा बसून दहशतवादाला मिळणारे पाठबळ निश्चितच कमी होईल, असे मत माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी ’लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. या दहशतवादाबरोबरच काळा बाजार आणि गुन्हेगारी कमी होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नोटाबंदीच्या निर्णयाचा दहशतवाद आणि गुन्हेगारीवर परिणाम सांगताना माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित म्हणाले, पाकिस्तानात दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी बनावट नोटा सहजपणे छापत होते. शिवाय हाच पैसा मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, अमली पदार्थाच्या तस्करींवर गुंतवणूक करत होते. या निर्णयामुळे त्यावर अंकुश बसण्यास मदत होणार आहे. देशाबाहेर अतिरेकी कारवाया सुरू असताना देशाअंतर्गत वर्चस्व वाढविण्यासाठी माओवाद, नक्षलवाद्यांनी लूट अथवा विविध मार्गाने मिळविलेला पैसा लपवून ठेवला आहे. ठिकठिकाणी दडवून ठेवलेले हजारो कोटी रुपयांच्या नोटांचा फायदा त्यांना होणार नाही. अशात त्यांना लागणारे शस्त्र,अन्न आणि औषधसाठा यासाठी लागणाऱ्या पैशांवर कुऱ्हाड पडणार आहे. त्यामुळे गुन्हे करण्यासाठी लागणारे त्यांचे प्राबल्य कमी होईल. (प्रतिनिधी)