शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या महाराष्ट्र बंदला शिवसेनेचा पाठिंबा

By admin | Updated: June 5, 2017 04:39 IST

शेतकऱ्यांना पेन्शन आदी मागण्यांसाठी सोमवारी, ५ जून रोजी पुकारण्यात आलेल्या बंदला शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना पेन्शन आदी मागण्यांसाठी सोमवारी, ५ जून रोजी पुकारण्यात आलेल्या बंदला शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र बंदला आमचा पाठिंबा असून मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, अशी माहिती शिवसेना सचिव आणि प्रवक्ते खासदार विनायक राऊत यांनी दिली. महाराष्ट्र बंदबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना राऊत म्हणाले की, शिवसेनेने कायम शेतकऱ्यांसाठी लढा दिला आहे. सोमवारच्या संपाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असणार आहे. मोठ्या ताकदीनिशी शिवसैनिक संपात सहभागी होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. अत्यावश्यक सेवा वगळता बंदला शिवसेनेचा पाठिंबा असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी संपाबाबत राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर या वेळी टीका केली. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी नेत्यांना टाळून रात्री बैठक घेतली. प्रत्येक बाबतीत मोजक्याच मंडळींना बोलावून चर्चा करायची पद्धत योग्य नाही. सर्व शेतकरी झोपलेले असताना संप संपल्याचे जाहीर करण्यात आले. शेतकरी मागण्यांवर तातडीने निर्णय न घेता समिती नियुक्त करू, समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेऊ असा वेळकाढूपणा करण्यात येत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा तोडगा नाकारलेला आहे. शेतकऱ्यांमध्ये दुही माजविण्याचाच हा प्रकार केला जात असल्याची टीकाही विनायक राऊत यांनी केली.