शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

धर्माच्या राजकारणाला पाठबळ

By admin | Updated: January 21, 2017 01:09 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कायम हिंदूंव्यतिरिक्त इतर सर्व धर्मांचा द्वेष, अशीच भूमिका घेतलेली आहे.

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कायम हिंदूंव्यतिरिक्त इतर सर्व धर्मांचा द्वेष, अशीच भूमिका घेतलेली आहे. संघाचा इतिहास आणि संघाद्वारे प्रकाशित साहित्याचा अभ्यास केल्यास, त्यांच्यापुढे मुस्लिम, ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट अशी तीन आव्हाने आहेत. संघाच्या लोकांनी देशात धर्माच्या राजकारणाला पाठबळ दिले. स्वामी विवेकानंददेखील आपले असल्याचा त्यांचा कांगावा अनेक वर्षांपासून सुरू आहे, अशा शब्दांत प्रसिद्ध नाटककार अतमजितसिंग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला.जनसहयोग फाउंडेशन आणि एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशनतर्फे आयोजित विचारवेध संमेलनाचे शुक्रवारी उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ‘भारताचा राष्ट्रवाद - संकल्पना, स्वरूप, आव्हाने’ हा विषय घेऊन हे तीन दिवसीय संमेलन होत आहे. या वेळी प्रा. विजय नाईक, प्रमोद निरगुडकर, संमेलनाचे आयोजक आनंद करंदीकर आदी उपस्थित होते.देशाच्या इतिहासाचा मागोवा घेत अतमजितसिंग यांनी ‘देशभक्ती’च्या व्याख्येवर परखड भाषेत टीका केली. ते म्हणाले, ‘‘देशातील नागरिकांमध्ये देशभक्तीची बिजे रुजवायची असतील, तर नागरिकांमध्ये एकमेकांप्रति मानवतेची आणि प्रेमाची भूमिका निर्माण होण्याची आवश्यकता आहे. नागरिकांमध्ये देशभक्ती निर्माण होण्यासाठी महान इतिहासाची आणि त्या प्रकारचे वातावरण तयार होण्याची गरज असते. कोणी एखादा येईल आणि म्हणेल देशभक्त व्हा, असे शक्य होऊ शकत नाही.‘‘देशभक्तीचे डोस देऊन ती भावना निर्माण होत नसते. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांत देशभक्तीची व्याख्याच बदलली आहे. संघाला विशिष्ट प्रकारची देशभक्ती अभिप्रेत आहे.’’निरगुडकर यांनी प्रास्ताविक केले. नाईक यांनी मनोगत व्यक्त करून विचारवेध संमेलनाचे उद्देश, भूमिका आणि कार्यपद्धती यांची माहिती दिली.