शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या संपाला काँग्रेसचा पाठिंबा - अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2017 19:00 IST

केंद्र व राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि शेतकरी विरोधी धोरणांमुळे राज्यातला शेतकरी देशोधडीला लागला आहे. सत्तेत बसलेल्या लोकांना शेती आणि शेतक-यांच्या प्रश्नांबाबत काहीच

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 01 -  केंद्र व राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि शेतकरी विरोधी धोरणांमुळे राज्यातला शेतकरी देशोधडीला लागला आहे. सत्तेत बसलेल्या लोकांना शेती आणि शेतक-यांच्या प्रश्नांबाबत काहीच कळत नसल्याने शेतक-यांवर संप करण्याची वेळ आली असल्याचे म्हणत शेतक-यांच्या या संपाला कॉंग्रेसचा पाठिंबा असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी सांगितले.  
भाजपाचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात साडे नऊ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. चुकीची धोरणे राबवून सरकारने शेतक-यांना वा-यावर सोडले आहे. यावर्षी सरकारच्या आवाहनामुळे शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर तुरीचे पीक घेतले. मात्र सरकार शेतक-यांची तूर खरेदी करायलाही टाळटाळ करत आहे. सोयाबीन, तूर, कांदा, फळे, दूध अशा शेतक-यांच्या कुठल्याही मालाला भाव नाही. शेतक-यांनी आणि विरोधी पक्षांनी याबाबत वारंवार सरकारकडे मागण्या केल्या, काँग्रेसने विधीमंळात तसेच रस्त्यावर उतरून कर्जमाफीची मागणी केली. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आणि शेतक-याला संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी हाच तातडीचा उपाय आहे. मात्र, आज सरकारमध्ये बसलेल्या लोकांना शेती आणि शेतक-यांचे प्रश्नच कळत नाहीत. त्यामुळे भारताच्या इतिहासात कधी नव्हे, ते संप करण्याची वेळ शेतक-यांवर आली असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. 
शेतक-यांनी मुंबई, पुणे यांसारख्या शहरात जाणारे दूध, भाजीपाला, फळे यांचा पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे शहरातील लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तूर खरेदीची मागणी करणा-या शेतक-यांना सत्ताधारी भाजपाचे नेते शिवीगाळ करीत आहेत. शिवारसंवाद यात्रेत शेतक-यांना साले, चालते व्हा अशी भाषा भाजपचे नेते व आमदार वापरत आहेत. शेतक-यांकडून पाय धुवून घेण्यापर्यंत भाजपा नेत्यांची मजल गेली आहे.  मंत्रालयात शेतक-याला मारहाण आणि मंत्रालयाच्या गेटवर शेतकरी आत्महत्या भाजपा सरकारच्या काळात झाली. त्यापुढे जाऊन भाजपाचे प्रवक्ते शेतकरी संपावर गेले तरी सरकारला काही फरक पडणार नाही असे म्हणत आहेत. यावरून हे सरकार शेतक-यांच्या प्रश्नांबाबत असंवेदनशील आहे,  हे स्पष्ट आहे असेही अशोक चव्हाण म्हणाले.