शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सुपरशेफ विष्णू मनोहरांचा नवा विश्वविक्रम, सलग 53 तास केलं कूकिंग

By admin | Updated: April 23, 2017 18:10 IST

शेफ विष्णू मनोहर यांनी सलग 53 तास कुकिंग करून एक हजार शाकाहारी खाद्यपदार्थ तयार करण्याचा नवा विश्वविक्रम केला आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 23 - शेफ विष्णू मनोहर यांनी सलग 53 तास कुकिंग करून एक हजार शाकाहारी खाद्यपदार्थ तयार करण्याचा नवा विश्वविक्रम केला आहे. अमेरिकेच्या बेंजामीन जे पेरी यांच्या नावावर असलेला सलग 40 तासांचा कुकिंगचा विश्वविक्रम मोडीत काढत सुपरशेफ विष्णू मनोहरांनी नवा इतिहास रचला आहे. रात्री 2 वाजून 56 मिनिटांनी त्यांनी बेंजामीन पेरी यांचा हा विक्रम मोडून काढत सलग 53 तास कुकिंग केलं आहे. तत्पूर्वी सलग 40 तासांचा न थांबता कुकिंग करण्याचा विक्रम अमेरिकेच्या बेंजामीन जे पेरी यांच्या नावे होता. मात्र शेफ विष्णू मनोहरांनी हा विक्रम मोडीत काढत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.या विक्रमाकरता 375 प्रकारच्या भाज्या, ग्रोसरी, मसाले हे उपयोगात आणले गेले आहेत. लागोपाठ आठ चुलींचा वापर करून विष्णू मनोहरांचा कुकिंगचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. एकाच वेळी त्यांनी तीन ते चार पदार्थ तयार केले आहेत. त्यामुळे सुमारे तीनशे ते चारशे किलो जेवण तयार झालं असून, मैत्री परिवारातर्फे इन्स्टिट्युट ऑफ इंजिन‌ीअर्स येथे या मॅरेथॉन स्वयंपाक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी 7.15 वाजता या उपक्रमाची सुरुवात झाली होती. सलग तीन दिवस हा खाद्यपदा‌र्थांचा उत्सव सुरू होता. त्यानंतर आज संध्याकाळी 5.30 ला कुकिंग थांबवलं आहे.या मॅरेथॉन उपक्रमात जवळपास सर्व भारतीय खाद्यपदार्थ तयार केले गेलेत. त्यातील केवळ 40 पदार्थ हे भारताबाहेरील आहेत. यावेळी सुपरशेफ विष्णू मनोहर यांना मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. विष्णू मनोहरांनी हा सर्व विक्रम शेतक-यांना समर्पित केला आहे. विष्णू मनोहरांनी आई वडील, पत्नी, मैत्री परिवार, मीडिया, चाहते, सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच शेवटच्या तीन डिशेस अनुक्रमे शेतकऱ्यांची मुले, अन्नपूर्णा देवी आणि शेगावचे गजानन महाराज यांना समर्पित केल्या आहेत. विक्रमाची वैशिष्ट्यं- स्वयंपाकासाठी आठ शेगड्यांचा वापर- एसींनी सुसज्ज स्वयंपाकगृह, चित्रीकरणासाठी होते कॅमेरे, 120 मदतनीस- दर एक तासाने घेतला पाच मिनिटांचा ब्रेक- प्रचंड प्रमाणात लागणा-या स्वयंपाकाचे साहित्य होते उपलब्ध - उपस्थितांना चाखायला मिळाली पदार्थांची चव- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर केला होता सराव- यू ट्युबवरही व्हिडीओ व्हायरल- संत गजानन महाराज यांच्या पोथीचे केले सलग पारायण