शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
5
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
6
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
7
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
8
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
9
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
10
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
11
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
12
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
13
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
14
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
15
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
16
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
17
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
18
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
19
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
20
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

सुपर स्पेशालिटीचा निर्णय दोन दिवसांत

By admin | Updated: May 11, 2016 04:21 IST

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एमबीबीएस आणि डेन्टलच्या प्रवेशासाठी ‘नीट’वर शिक्कामोर्तब केल्यानंतर नीट की सीईटी, हा तिढा सुटला असला तरी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाबाबतचा संभ्रम कायम आहे

अतुल कुलकर्णी, मुंबई सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एमबीबीएस आणि डेन्टलच्या प्रवेशासाठी ‘नीट’वर शिक्कामोर्तब केल्यानंतर नीट की सीईटी, हा तिढा सुटला असला तरी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाबाबतचा संभ्रम कायम आहे. १० जून रोजी होणाऱ्या एमडी आणि एमएस या सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमासाठी ‘नीट’ द्यायची की ‘सीईटी’ याविषयी येत्या दोन दिवसांत मेडिकल कॉन्सिल आॅफ इंडिया (एमसीआय) निर्णय घेणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘लोकमत’ला दिली.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता ‘नीट’चे वेळापत्रक सीबीएससी जाहीर करणार आहे. २४ जुलै रोजी परीक्षा होऊन १७ आॅगस्टपर्यंत ‘नीट’चा निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी दिली. राज्यात १० स्वायत्त (डिम्ड) वैद्यकीय महाविद्यालये असून, त्यांच्याकडे एमबीबीएसच्या १६७५ आणि डेंन्टलच्या ९०० जागा आहेत. तर १५ खासगी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या १७२० आणि डेन्टलच्या १७८० जागा आहेत. या सर्व जागांवरील प्रवेशसुद्धा ‘नीट’नुसारच होणार आहेत. ५ मे रोजी झालेल्या सीईटीनुसार आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, अ‍ॅक्युप्रेशर थेरपी, फिजीओथेरपी, बीएस्सी नर्सिंग, फार्मसी, व्हेटरनरी आणि इंजिनिअरिंगचे २०,८३० प्रवेश दिले जाणार आहेत.ज्यांनी ‘नीट’ दिली त्यांना आणखी एक संधी १ मे रोजी राज्यात ‘नीट’चा पहिला टप्पा पार पडला. त्यासाठी ७० हजार विद्यार्थी बसले होते. परंतु ज्यांना अभ्यासाला वेळ मिळाला नसेल त्यांना पुन्हा २४ जुलै रोजी होणाऱ्या ‘नीट’साठी बसता येईल. तशी परवानगी सर्वाेच्च न्यायालयाने दिली आहे. ज्यांना ‘नीट’ दुसऱ्यांदा द्यायची ते देऊ शकतील; पण दुसऱ्या परीक्षेत जर पहिल्या परीक्षेपेक्षा कमी गुण मिळाले तर मात्र कमी पडलेले गुण गृहीत धरले जातील. त्यामुळे ही संधी घ्यायची की नाही हे विद्यार्थ्यांनी ठरवायचे आहे.वाहिन्यांवरून अभ्यास घेणार - तावडेराज्यातल्या ‘सह्याद्री’सह विविध वाहिन्यांचे काही दिवस रोज एक तास विकत घेतला जाईल आणि त्यावरून तज्ज्ञांचे मार्गदर्शन मुलांना देता येईल. त्यासाठी किती खर्च येईल याचा आढावा व त्यासाठी काय तयारी करावी लागेल यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री तावडे यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली. केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्याशी आपले बोलणे झाले असून, ‘सह्याद्री’वरचा एक तास देण्याची तयारी त्यांनी दर्शविल्याचे तावडे यांनी सांगितले.अभ्यासक्रमकॉलेज प्रवेश क्षमताबीई इंजिनीअरिंग३६७१,५३,८००फार्मसी१६११०,७७०आयुर्वेद६२३३०५होमिओपॅथी४५३१४५युनानी५२७०फिजीओथेरपी३५१०९५अ‍ॅक्युप्रेशर थेरपी६१५०नर्सिंग४७२०३५बीएएसीएलपी३४५बीपीओ११५