महाड : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे आपण अजिबात खचलो नाही तर नव्या उमेदीने पुन्हा जोमाने कामाला लागलो. मंत्रिपदापेक्षा संघटनेलाच आपण अधिक महत्त्व देत असतो. आता विकासाच्या मुद्द्यावरच येत्या विधानसभेला सामोरे जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रविवारी स्पष्ट केले.माणगाव येथे राष्ट्रवादीचा निर्धार मेळावा झाला, त्यात ते बोलत होते. चार वेळा या मतदारसंघातील नागरिकांनी मला निवडून दिले़ १० वर्षे शरद पवार यांच्यामुळे मला रायगडचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली़ तिचा वापर आपण सामान्य जनतेसाठीच केला. येत्या विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शंभर टक्के यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अनेक लाटा येतील आणि जातील, पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला दिशा देण्याची धमक केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच असल्याने येत्या विधानसभेतही पुन्हा राज्यात सत्तेवर येण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी व्यक्त केला.मुस्लीम समाज आरक्षणाबाबत काही राहिलेल्या त्रुटी दुरुस्त करण्याचे आश्वासनही पवार यांनी या वेळी दिले. (वार्ताहर)
पराभवाने खचलेलो नाही-सुनील तटकरे
By admin | Updated: August 18, 2014 03:42 IST