शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

बलात्काराच्या आरोपातून सुनिल पारसकरांची निर्दोष सुटका

By admin | Updated: December 4, 2015 17:36 IST

बलात्काराच्या आरोपातून महाराष्ट्र पोलिस दलाचे निलंबित डीआयजी सुनिल पारसकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने आज निर्दोष म्हणून सुटका केली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ४ - बलात्काराच्या आरोपातून महाराष्ट्र पोलिस दलाचे निलंबित डीआयजी सुनिल पारसकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने आज निर्दोष म्हणून सुटका केली आहे. त्यांच्यावर एका मॉडेलने बलात्काराचा आरोप केला होता. गेल्यावर्षी जुलै महिन्यात एका मॉडेलने मालवणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. संबंधित मॉडेलने पारसकर यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यावरही त्यांनी सर्व आरोप फेटाळले होतेच, शिवाय हा एक बनाव असल्याचं म्हटलं होतं. इतकंच नाही तर संबंधित मॉडेलच्या वकिलानेही पारसकर यांचा दावा योग्य असल्याचं स्पष्ट केलं होतं. 

>>काय आहे प्रकरण
१९९७च्या बॅचचे आयपीएस असलेल्या पारसकर यांच्यावर गोरेगाव येथे राहणा:या २६ वर्षीय मॉडेलने बलात्कार केल्याची तक्रार मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बलात्काराचा आरोप करणारी मॉडेल आणि पारसकर एप्रिल २०१३पासून ओळखत होते. एप्रिलमध्ये मॉडेलने आपल्या भावाविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. भावाने आपल्या आईला मारहाण केल्याचा आरोप या मॉडेलने केला होता. मात्र दिंडोशी पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे दाद मागण्यासाठी ती पारसकर यांच्याकडे गेली होती. यानंतर ऑक्टोबरमध्ये याच मॉडेलने तिच्या सोसायटीत राहणा:या एका तरुणाविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दिली होती. काही दिवसांनी पारसकर यांनी ‘तू या प्रकरणात एकटय़ाने काहीच करू शकणार नाहीस, माझ्यायाशी संपर्क साध’, असे सूचित केल्याचा दावा या मॉडेलने केला होता .
> याच दरम्यान एका एस्कॉर्ट एजन्सीच्या वेबसाइटवर (वेश्याव्यवसायासाठी हायप्रोफाइल तरुणी पुरविणारे अवैध रॅकेट) या मॉडेलचा फोटो प्रसिद्ध झाला होता. त्याचा त्रस झाल्यानंतर मॉडेलने थेट उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त असणा:या पारसकर यांची भेट घेतली. याप्रकरणी पारसकर यांनी तपासाचे आदेश दिले. 
> २ जानेवारी २०१४ रोजी वेबसाइटवर मॉडेलचा फोटो प्रसिद्ध करणा:यांविरोधात गुन्हा नोंदविला. तसेच या गुन्ह्यातील सर्वाना गजाआड केले.
> मॉडेलच्या दाव्यानुसार, त्याआधी नोव्हेंबर-डिसेंबर २०१३ मध्ये पारसकर यांनी मला एक फ्लॅट दाखविण्याच्या निमित्ताने ठाण्यातील एका इमारतीत नेले. फ्लॅटमध्ये गेल्यावर पारसकर यांनी माङयाशी लगट करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यास मी विरोध केल्यानंतर त्यांनी माफी मागितली. 
> आठवडय़ानंतर एका रिअल इस्टेट एजंटची भेट घालून देण्याच्या निमित्ताने पारसकर यांनी या मॉडेलला मढ बेटावरील बंगल्यात नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. पारसकर यांच्या जबरदस्तीने आपण जखमी झालो, असा दावाही त्या मॉडेलने जबाबात केला.
> ही घटना घडल्यानंतर पारसकर यांनी या मॉडेलला आय-फोन भेट म्हणून दिला. तसेच एस्कॉर्ट एजन्सीच्या प्रकरणात मदत केल्याबद्दल ‘तूही मला काही तरी द्यावेस’, अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हा मॉडेलने पारसकर यांना महागडय़ा घडय़ाळांचे (लॉन्जिनीज) फोटो पाठवले. त्यापैकी एक पारसकर यांनी पसंत केले. ते ७० हजारांचे घडय़ाळ मॉडेलने त्यांना भेट म्हणून दिले. 
> पारसकर यांची अपर आयुक्त पदावरून राज्य पोलीस मुख्यालयात बदली झाली. तेव्हा मॉडेलने पारसकर यांना ५७ हजार रुपयांचे पाकीट (वॉलेट), पेन आणि परफ्युम गिफ्ट केले. तेव्हा बदली रोखण्यासाठी काही प्रयत्न करू शकतेस का, अशी विचारणा पारसकर यांनी केली होती. तेव्हा मॉडेलने तिच्या पीआर व्यवस्थापकाशी त्यांची भेट घालून दिली. त्यावेळी पारसकर यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. पारसकर यांनी केलेल्या अत्याचाराची माहिती त्यांच्या पत्नीला त्याचवेळी द्यायची होती; मात्र पारसकर यांनी पत्नीला जराही एकांत न दिल्याने मला संधी मिळाली नाही, असाही दावा या मॉडेलने केल्याचे समजते. 
> याप्रकरणी  पारसकर यांची चौकशीही करण्यात आली होती, त्यानंतर त्यांना अटकपूर्व जामीनही मंजूर करण्यात आला. केस मागे घेण्यासाठी पारसकर दबाव टाकत असल्याचा आरोप मॉडलने केला होता. त्यानंतर या मॉडेलच्या वकिलाने केसमधून माघारही घेतली होती. ही मॉडेल कशा पद्धतीनं पारसकरांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतेय हे सांगणारा व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आला होता