शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सुनील गावसकर व दिलीप वेंगसरकर संघांची दणदणीत आगेकूच

By admin | Updated: May 18, 2016 05:57 IST

सुनील गावसकर इलेव्हन संघाने सचिन तेंडुलकर इलेव्हनला एक डाव व ७६ धावांनी लोळवून २३ वर्षांखालील माधव मंत्री चषक क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली

मुंबई : सुनील गावसकर इलेव्हन संघाने सचिन तेंडुलकर इलेव्हनला एक डाव व ७६ धावांनी लोळवून २३ वर्षांखालील माधव मंत्री चषक क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. अन्य सामन्यात दिलीप वेंगसरकर इलेव्हन संघाने आंध्र प्रदेश संघाला १२० धावांनी नमवले.वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून सचिन तेंडुलकर संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र अतुल सिंग (६/४०) आणि एश्वर्य सुर्वे (३/१५) यांच्या भेदक माऱ्यापुढे तेंडुलकरचा डाव ८४ धावांत संपुष्टात आला. यानंतर वैदिक मुरकर (८०), विक्रांत औती (५५), प्रणव मेनन (४५) व सचिन यादव (३१) यांच्या जोरावर गावसकर संघाने २९७ धावांची मजल मारून २१३ धावांची मजबूत आघाडी घेतली. यानंतर तेंडुलकर संघाचा डाव पुन्हा घसरला. मिनाद मांजरेकर (४/२६) व के. कोठारी (३/३८) यांनी अचूक मारा करत तेंडुलकर संघाला १३७ धावांत गुंडाळून गावसकर संघाच्या विजयावर शिक्का मारला. अजिंक्य पाटीलने (५२) तेंडुलकर संघाकडून एकाकी झुंज दिली. बीकेसी येथे झालेल्या सामन्यात दिलीप वेंगसरकर संघाने आंध्र प्रदेशला १२० धावांनी नमवले. वेंगसरकर संघाने प्रथम फलंदाजी करताना २०० धावांवर डाव घोषित केला. कुशल धवणे (७३), आकाश आनंद (४०) व ध्रुमील मटकर (३९) यांनी चांगली फटकेबाजी केली. यानंतर आंध्रने २२० धावा फटाकावून २० धावांची आघाडी मिळवली. वेंगसरकरने यानंतर ७ बाद २४८ धावांवर डाव घोषित करून आंध्रला विजयासाठी २२९ धावांचे लक्ष्य दिले. या वेळी ध्रुमीलच्या (६/१७) भेदकतेपुढे आंध्रचा डाव केवळ १०८ धावांवर संपुष्टात आणला.