शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

सुनीत जाधवचाच बोलबाला

By admin | Updated: April 24, 2017 02:54 IST

स्टार शरीरसौष्ठवपटू सुनीत जाधव याने पुन्हा एकदा आपला दबदबा राखताना तिसऱ्यांदा मानाची मुंबई महापौर श्री स्पर्धा जिंकली.

मुंबई : स्टार शरीरसौष्ठवपटू सुनीत जाधव याने पुन्हा एकदा आपला दबदबा राखताना तिसऱ्यांदा मानाची मुंबई महापौर श्री स्पर्धा जिंकली. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षात त्याने तिसऱ्यांदा या स्पर्धेवर वर्चस्व राखले. त्याचवेळी, त्याने यंदाचा मुंबई श्री ठरलेल्या अतुल आंब्रेचे आव्हान सहजपणे परतावून लावले. दरम्यान, अभिषेक खेडेकर याने आपल्या आकर्षकरीत्या शरीरयष्टीचे प्रदर्शन करताना बेस्ट पोझरचा किताब पटकावला.बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना व मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटना यांच्या सहकार्याने शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने पार पडलेल्या या स्पर्धेत सुनीतचाच बोलबाला राहिला. ८० किलोवरील वजनी गटातून सहभागी झालेला सुनीत ज्यावेळी मंचावर आला, तेव्हाच स्पर्धेचा विजेता निश्चित झाला. सुनीतनेही आपल्या चाहत्यांना निराश न करताना सहजपणे वर्चस्व राखताना आपला आंतरराष्ट्रीय दर्जा सिद्ध केला. विशेष यंदा सर्वांचे लक्ष वेधलेल्या अतुल आंब्रेकडून सुनीतला मोठी स्पर्धा मिळण्याची शक्यता होती. परंतु, सुनीतच्या बलाढ्य शरीरयष्टीपुढे अतुलचा निभाव लागला नाही.६० किलो वजनी गटात अनपेक्षित कडवी झुंज पाहण्यास मिळाली. या गटात मि. वर्ल्ड विजेता नितीन म्हात्रे संभाव्य विजेता होता. झालेही तसेच, परंतु यासाठी त्याला बरेच झुंजावे लागले. उमेश गुप्ता आणि विराज लाड यांनी जबरदस्त प्रदर्शन केल्यानंतर नितीनला दोघांसह कंपेरिझनसाठी उतरावे लागले. यावेळी मात्र नितीनने आपला अनुभव पणास लावत बाजी मारली. त्याचप्रमाणे, ७० किलो वजनीगटात संतोष भरणकर याने लक्ष वेधताना अनुभवी विलास घडवले झुंजवले. मात्र, मोक्याच्यावेळी गुण गमावल्याचा फटका बसल्याने संतोषला गटउपविजेपदावर समाधान मानावे लागले. (क्रीडा प्रतिनिधी)गटनिहाय विजेते :-५५ किलो गट : १. संदेश सकपाळ (परब फिटनेस), २. नितीन शिगवण (वक्रतुंड), 3. जितेंद्र पाटील (माँ साहेब).६० किलो : १. नितीन म्हात्रे (पॉवर झोन), २. उमेश गुप्ता (क्रिएटर जिम), ३. विराज लाड ( बॉडी वर्पशॉप).६५ किलो: १. बप्पन दास (आरकेएम), २. प्रदीप झोरे (माय फिटनेस), ३. उमेश पांचाळ (आर.एम.भट).७० किलो : १. विलास घडवले (बॉडी वर्पशॉप), २. संतोष भरणकर (परब फिटनेस), ३. विशाल धावडे (बाल मित्र).७५ किलो : १. प्रतिक पांचाळ (परब फिटनेस), २. लीलाधर म्हात्रे (आरकेएम), ३. राहुल तर्फे (बॉडी वर्पशॉप).८० किलो : १. सुशील मुरकर (आरकेएम ), २. अभिषेक खेडेकर (बॉड़ी वर्पशॉप), ३. गोपाळ फौजदार(बी आॅम).८० किलोवरील : १. सुनीत जाधव (माय फिटनेस), २. अतुल आंब्रे (हरक्युलस जिम), ३. सत्यजीत प्रतिहारी (फिट फायटर).