शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

रविवार ठरला ‘घात’वार!

By admin | Updated: February 8, 2016 04:28 IST

राज्यभरात रविवारी झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये तब्बल दहा जणांचा मृत्यू झाला आहे. यातील दोन जणांचा दरड कोसळून, दोन जणांचा गुदमरून, तर पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे

मुंबई : राज्यभरात रविवारी झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये तब्बल दहा जणांचा मृत्यू झाला आहे. यातील दोन जणांचा दरड कोसळून, दोन जणांचा गुदमरून, तर पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे रविवार राज्यासाठी घातवार ठरला आहे. जळगावातील रावेर येथे भोकर नदी काठावरील खाणीत जेवत असलेल्या दोन मजुरांच्या अंगावर दरड कोसळून त्यांचा अंत झाला़ रविवारी दुपारी तामसवाडी गावालगत ही घटना घडली. कडू साहेबराव ढाकणे(४२) व प्रल्हादसिंग शंकरसिंग राजपूत (५०) अशी मृत मजुरांची नावे आहेत़अहमदनगरमधील राहाता येथील साकुरी शिवारात मोठ्या प्रमाणात वीजभट्ट्या असून, बहुतांश कामगार परराज्यातून आलेले आहेत. अनुप मोहन राज (१८) व मिथून राजकुवर राज (१२, दोघेही रा. उत्तर प्रदेश) हे दोघे पहाटे भट्टीवर गेले. परंतु प्रचंड धुराच्या लोळात त्यांना श्वास घेणे मुश्किल झाले आणि त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. दरम्यान, धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील मानव रुहानी केंद्रात सुरू असलेल्या नामदान सप्ताहासाठी बडोदा येथून आलेल्या तीन युवकांचा येथील लाटीपाडा धरणात रविवारी दुपारी बुडून मृत्यू झाला. आकाश पाटील(१६), युवराज बागुल(२०) आणि भरत राठोड (२६) अशी त्यांची नावे असून ते धरणाच्या जलाशयात पोहण्यासाठी गेले होते. तसेच राजस्थानातील गोपालक कुुटुंबातील एका महिलेसह तिच्या दोन मुलींचा चंद्रपुरमधील चिमूर तालुक्यातील सावगाव-मालेवाडा परिसरात तलावात बुडून मृत्यू झाला. कपडे धुण्यासाठी तलावावर गेली असताना महिलेच्या मुली पाण्यात पडल्या आणि त्यांना वाचविण्यासाठी गेली असताना तिचाही बुडून मृत्यू झाला. (प्रतिनिधी)