शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

राज्यातील उन्हाचा कडाका कायम

By admin | Updated: March 5, 2017 01:02 IST

राज्यात उन्हाचा कडाका कायम असून विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यातील तापमानाचा कमाल पारा ३५ अंश सेल्सिअसच्या पुढेच आहे. शनिवारी राज्यात स

पुणे : राज्यात उन्हाचा कडाका कायम असून विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यातील तापमानाचा कमाल पारा ३५ अंश सेल्सिअसच्या पुढेच आहे. शनिवारी राज्यात सर्वाधिक ३७.९ अंश सेल्सिअस तापमान अकोल्यात नोंदविण्यात आले. कोकण किनारपट्टी परिसरातील वातावरणातील उष्मा कमालीचा वाढला आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील कमाल आणि किमान तापमानातही वाढ झाली आहे. अकोल्यातील किमान तापमान १९, तर कमाल तापमान ३७.९ अंश सेल्सिअसवर पोचले आहे. अमरावती येथे ३६, तर किमान तापमान १८, बुलडाण्यात ३५.२, तर किमान तापमान १९.६ अंश सेल्सिअसवर गेले आहे. चंद्रपुरातील पारा ३६.८ असून, किमान तापमानही २० अंश सेल्सिअस असल्याने उष्मा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नागपूरातील कमाल तापमान ३६.२, वाशिम ३३.८, वर्धा ३७.२ आणि यवतमाळचे तापमान ३५.८ अंश सेल्सिअसवर पोचले आहे. मराठवाड्यातील औंरगाबादचा पारा ३४.६ अंश सेल्सिअसवर आहे. परभणीत ३७, नगरमध्ये ३७.५, जळगाव ३५.६, कोल्हापूर ३५.६, महाबळेश्वर ३२, मालेगाव ३६.८, सांगली ३७, सातारा ३५.६ आणि सोलापूरचा पारा ३७.२ अंश सेल्सिअसवर पोचला आहे. सर्वात कमी तापमान नाशिकमध्ये १२.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. येथील कमाल तापमान ३४.५ अंश सेल्सिअस होता. पुण्यातील कमाल तापमान ३५, तर किमान तापमान १२.९ अंश सेल्सिअस होते. (प्रतिनिधी)