मुंबई : ख्वाजा सुफी मजिदूल हसन शाह यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनी होणाऱ्या उरुस सोहळ्यात १८ एप्रिल रोजी देशभरातील सुफी संतांचे संमेलन व त्यांचा मुशायरा अनुभवण्याची पर्वणी मुंबईकरांना मिळणार आहे. त्यासाठी अनेक सुफी संत या निमित्ताने प्रथमत: अॅण्टॉप हिल येथील मेहफिल-ए-जहांगिरिया येथे एकत्र येणार आहेत.१८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत त्यांच्या स्वरबद्ध वाणीतील मुशायरा ईश्वराची आळवणी करणार असून, तो प्रत्यक्ष अनुभवण्याची पर्वणी मुंबईकरांना मिळणार आहे. सज्जाद नसीन डॉ. सुफी फैजुल हसन शहा यांनी या संमेलनाचे नियोजन केले आहे. (प्रतिनिधी)
मुंबईत सुफी संतांचे संमेलन
By admin | Updated: April 13, 2015 11:38 IST