शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या प्रेमीयुगुलाची यवतमाळमध्ये आत्महत्या

By admin | Updated: October 16, 2014 05:03 IST

येथील स्मशानभूमीत बुधवारी पुण्याच्या प्रेमीयुगुलाने विषप्राशन करून आत्महत्या केली. दोघेही विवाहित असून त्यांचे एकमेकांवर प्रेम होते.

महागाव (यवतमाळ) : येथील स्मशानभूमीत बुधवारी पुण्याच्या प्रेमीयुगुलाने विषप्राशन करून आत्महत्या केली. दोघेही विवाहित असून त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. जयश्री दीपक भोंगाडे (३१ रा. खुरपुडी ता. खेड) आणि एकनाथ तुकाराम चौधरी (४२ रा. निमगाव ता. खेड) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाची नावे आहेत. दोघे मजुरी करत होते. दोघेही विवाहित असून जयश्रीला तीन मुले तर एकनाथला दोन अपत्ये आहेत. गेल्या दोन दिवसांपासून दोघेही महागाव तालुक्यातील काळीटेंभी परिसरात एका वाहनाने संशयास्पदरित्या फिरत होते. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी महागाव पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी बोलाविले. दोघेही विवाहित आणि सज्ञान असल्याने चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांनाही त्यांच्याबद्दल माहिती दिली. मंगळवारी रात्री दोघांनीही महागाव येथील स्मशानभूमी गाठली. रात्री तेथे दोघांनीही विष प्राशन केले. बुधवारी सकाळी काही नागरिकांंना स्मशानभूमीत हे दोघे अत्यवस्थ आढळून आले. त्यापैकी एकनाथ यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. तर अत्यवस्थ स्थितीत जयश्री यांना सवना येथील रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांच्याकडील वाहन ताब्यात घेतले आहे.शवविच्छेदनानंतर दोघांचेही मृतदेह पुण्याकडे रवाना करण्यात आले. विशेष म्हणजे दोघेही मोलमजुरी करणारे असून दिग्रस तालुक्यातील विठोली येथील मजुरांच्या ओळखीने ते या परिसरात आले होते. गावकऱ्यांनी पोलिसांना तसेच नातेवाईकांना माहिती दिल्याने आपली बदनामी होईल या भीतीतून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जाते. (प्रतिनिधी)