शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दोन कर्जबाजारी शेतक-यांच्या आत्महत्या

By admin | Updated: April 1, 2017 17:29 IST

कर्जबाजारीपणामुळे चिंतातूर झालेल्या दोन शेतक-यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

ऑनलाइन लोकमत
रेणापूर, दि. 1 - कर्जबाजारीपणामुळे चिंतातूर झालेल्या दोन शेतक-यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.
सदाशिव एकनाथ माने (६०, रा़ ब्रम्हवाडी, ता़ रेणापूर) व इंद्रजित ज्ञानोबा तांदळे (४१, रा़ कोळवाडी, ता़ अहमदपूर) असे आत्महत्या केलेल्या शेतक-यांची नावे आहेत.  ब्रम्हवाडी येथील शेतकरी सदाशिव माने यांना ३० गुंठे शेती आहे त्यावर व मजुरी करुन त्यांचा उदरनिर्वाह होत असे. त्यांनी आपल्या तीन मुलींच्या विवाहासाठी खाजगी कर्ज घेतले आहे. या कर्जाच्या परतफेडीपोटी त्यांनी २० गुंठे जमीन विक्री केली.
त्यामुळे आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, अशी चिंता त्यांना भेडसावत होती. शनिवारी रात्री ते नेहमीप्रमाणे शेताकडे झोपण्यासाठी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी शेतातील शेडमधील आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, शनिवारी सकाळी त्यांची पत्नी सुशीला माने ह्या शेताकडे गेल्या असता त्यांना आपल्या पतीने आत्महत्या केल्याचे आढळून आले. याप्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे.
दुसरी घटना अहमदपूर तालुक्यातील कोळवाडी येथील आहे़ कोळवाडी येथील इंद्रजित ज्ञानोबा तांदळे (४१) यांच्या वडिलांच्या नावे १ हेक्टर ४८ आर शेतजमीन आहे. त्यांच्या वडिलांच्या नावावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सहा हजार रुपयांचे कर्ज आहे तसेच इंद्रजित तांदळे यांच्यावर खाजगी कर्ज असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
 या कर्जामुळे इंद्रजित तांदळे यांनी शुक्रवारी मध्यरात्री स्वत:च्या घरातील छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी किनगाव पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.