शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांना व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवून युवकाची आत्महत्या !

By admin | Updated: February 2, 2017 23:07 IST

कर्जाला कंटाळल्याने मी नदीत उडी घेऊन आत्महत्या करीत आहे, असा मेसेज मित्रांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवून युवकाने खरोखरच नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली.

आॅनलाइन लोकमतसातारा, दि. 2 - कऱ्हाड/कुसूर येथे कर्जाला कंटाळल्याने मी नदीत उडी घेऊन आत्महत्या करीत आहे, असा मेसेज मित्रांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवून युवकाने खरोखरच नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली. अंबवडे-कोळेवाडी, ता. कऱ्हाड येथे गुरुवारी दुपारी ही घटना घडली. याबाबतची नोंद रात्री उशिरा कऱ्हाड तालुका पोलिसांत झाली आहे. पवन अण्णासाहेब कोळेकर (वय २८, रा. कोळेवाडी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोळेवाडी येथे पवन कोळेकर हा आईसमवेत राहत होता. सध्या तो आगाशिवनगर येथील एका खासगी कंपनीत कामास होता. गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्येत असल्याचे आई व मित्रांच्या निदर्शनास आले होते. त्यांनी त्याबाबत त्याच्याकडे विचारणाही केली होती. मात्र, पवनने कोणास काहीही सांगितले नाही. दरम्यान, गुरुवारी सकाळी पवनने काही मित्रांना व्हॉट्सअ‍ॅपर एक मेसेज पाठविला. कर्जाला कंटाळून मी नदीत उडी घेऊन आत्महत्या करीत असल्याचे व या सर्वाला मी स्वत: जबाबदार असल्याचे त्याने मेसेजमध्ये म्हटले होते.पवनचा हा मेसेज आल्यानंतर मित्रांना धक्का बसला. काहींनी तातडीने त्याच्या मोबाईलला फोन केला. मात्र, मोबाईल बंद होता. त्यानंतर मित्रांनी एकमेकांना फोन करून बोलावून घेतले. सर्वजण वांग नदीपात्राकडे धावले. त्यांनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी वांग नदीकडेला कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यानजीक पवनची चप्पल व पाकीट आढळून आले. पवनने नदीत उडी घेतल्याची खात्री झाल्यानंतर मित्रांनी याबाबतची माहिती ग्रामस्थ व पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस व ग्रामस्थ त्याठिकाणी धावले. काही युवकांनी नदीपात्रात उडी घेऊन शोध घेतला. मात्र, पवन आढळून आला नाही. अखेर कऱ्हाडातील काही पाणबुडींना बोलविण्यात आले. पाणबुडींनी शोध घेतल्यानंतर पवनचा मृतदेह आढळून आला. याबाबत आकाश राजेंद्र सावंत याने कऱ्हाड तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे.पोलिसांकडून कसून चौकशीकर्जाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे पवनने मेसेजमध्ये म्हटले आहे. त्यामुळे त्याच्यावर कसले कर्ज आहे, याची माहिती पोलीस घेत आहेत. पैशांसाठी कोणी पवनला त्रास देत होते का, तसेच त्याने खासगी सावकाराकडून पैसे घेतले होते का, याचाही पोलीस तपास करीत आहेत. त्याअनुषंगाने काही जणांकडे कसून चौकशी करण्यात येत आहे.