शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला विष पाजून आत्महत्या

By admin | Updated: June 4, 2017 00:17 IST

पत्नीला विष पाजून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कवलापूर (ता. मिरज) येथे शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. या तरुणाला

- लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पत्नीला विष पाजून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कवलापूर (ता. मिरज) येथे शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. या तरुणाला कर्करोगाची लागण झाली होती. डॉक्टरांनी त्याला दोन महिने जगणार असल्याचे सांगितले होते, यातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे. तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे.शंकर कृष्णा भोसले (२९) व पूजा शंकर भोसले (२५) असे या दाम्पत्याचे नाव आहे. त्यांना मयुरी (४ वर्षे) व दर्शन (२ वर्षे) अशी दोन मुले आहेत. महिन्याभरापूर्वी प्रकृती बिघडल्यामुळे त्याने डॉक्टरांकडे तपासणी करून घेतली असता त्याला कर्करोग झाल्याचे स्पष्ट झाले. तुझे दोन-तीन महिने आयुष्य आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. यातून दोघांनी जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेऊन आत्महत्येचा मार्ग निवडला. शंकरने पत्नीच्या हाताच्या शिरा कापल्या व तिला विष पाजले. आत्महत्येपूर्वी चिठ्ठीशंकर भोसले याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. यामध्ये त्याने ‘मी व पूजा विष पिऊन आयुष्य संपवत आहे. माझी मुले मयुरी व दर्शनचा सांभाळ करा. माझा भाऊ नंदू खूप चांगला आहे. मी पोलीस भरती झालो नाही, पण माझा भाचा अनिल याने भरती व्हावे. माझ्या आई-वडिलांनी खूप कष्ट केले आहेत. त्यांनी आम्हाला माफ करावे’, असे लिहिले आहे.