नाशिक : लासलगाव येथील विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या केल्याची घटना रविवारी घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, निफ ाड तालुक्यातील कोटमगाव येथील सविता समाधान कदम (२१) या विवाहितेने दुपारच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले़ तिला उपचारासाठी पती समाधान पंढरीनाथ कदम याने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉ़ पाटील यांनी मयत घोषित केले़ दरम्यान, या घटनेची लासलगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
लासलगाव येथील विवाहितेची आत्महत्त्या
By admin | Updated: May 5, 2014 14:00 IST