ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ५ : अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीने नैराश्यातून राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास चिंचवड, बिजलीनगर येथे उघडकीस आला. ऋतुजा काशिद (वय १७, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी याबाबत माहिती दिली. ऋतुजा दहावी परिक्षा पास झाली होती. सध्या ती अकरावीच्या वर्गात शिकत होती. गेले चार-पाच दिवस ती नैराश्यात होती. तसेच ती महाविद्यालयातही गेली नव्हती. ऋतुजाची आई आणि भाऊ बाहेर गेला होता. थोड्यावेळा नंतर भाऊ घरी आला. त्याने दरवाजा ठोठावला तरी आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्याने दरवाजा तोडला असता ऋतुजा दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.