शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

By admin | Updated: April 25, 2016 05:20 IST

सासरच्या जाचाला कंटाळून देवनार येथील २५ वर्षीय यास्मीन खान या विवाहितेने शुक्रवारी आत्महत्या केली.

मुंबई : सासरच्या जाचाला कंटाळून देवनार येथील २५ वर्षीय यास्मीन खान या विवाहितेने शुक्रवारी आत्महत्या केली. देवनार पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करुन सासू आणि दिराला अटक केली होती. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीखातर यास्मीनच्या कुटुंबीयांनी रविवारी घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवरील वाहतूक अडवली होती. त्यामुळे या परीसरात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. देवनार येथील रहिवासी असलेल्या यास्मीनचा २०१२ मध्ये ट्रक ड्राईव्हर असलेल्या अक्र म खानसोबत विवाह झाला. त्यानंतर लग्नाच्या काही दिवसात खान कुटूंबियांनी तिच्याकडून गाडीची मागणी केली होती. त्याशिवाय वेळोवेळी तिच्या माहेरच्या मंडळींकडून पैसे उकळण्यात आले. पैशांसाठी तिच्यावर मानसिक आणि शारिरीक अत्याचार करण्यात येत होते. याच दरम्यान तिच्या पतीने दुसरा विवाह करुन तो सौदीला रवाना झाला. ही बाब समजताच यास्मीनने देवनार पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. शुक्रवारी तिच्या सासरच्या मंडळींनी तिला बेदम मारहाण करुन पुन्हा पैशांची मागणी केली. अखेर या जाचाला कंटाळलेल्या यास्मीनने माहेरच्या घरी येऊन आत्महत्या केल्याचे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन आरोपींवर कारवाई करावी या मागणीसाठी रविवारी यास्मीनचे कुटुंबीय रस्त्यावर उतरले.