शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येला सरकार जबाबदार

By admin | Updated: September 26, 2015 03:16 IST

भाजपा सरकार शेतकरी व कामगारविरोधी आहे. शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांना कर्जमाफी दिली जात नाही. दुसरीकडे एलबीटी रद्द करून भांडवलदारांचे हित जोपासले जात आहे.

नवी मुंबई : भाजपा सरकार शेतकरी व कामगारविरोधी आहे. शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांना कर्जमाफी दिली जात नाही. दुसरीकडे एलबीटी रद्द करून भांडवलदारांचे हित जोपासले जात आहे. व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या या थापाड्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे बळीराजाला आत्महत्या करावी लागत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या ८२व्या जयंतीनिमित्त एपीएमसीमध्ये कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी अजित पवार यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. ‘अच्छे दिन आएंगे’च्या थापा मारून भाजपाने केंद्र व राज्यात सत्ता मिळविली. सत्ता आली की १०० दिवसांमध्ये काळा पैसा भारतामध्ये घेऊन येणार. प्रत्येक नागरिकाला १५ लाख रुपये मिळतील अशी आश्वासने देण्यात आली. जनताही क्षणिक बावचळली, त्यांना निवडून दिले. परंतु जनहिताची कामे झाली नाहीत. गुजरातमध्ये हार्दिक पटेलचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. सरकारने कामगार कायद्याला हात लावला तर खपवून घेतले जाणार नसल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. नेत्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर आंदोलनाचा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला. मुख्यमंत्री आलेच नाहीत राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून कामगार त्यांच्यासोबत आहेत. प्रत्येक मेळाव्यास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री किंवा राष्ट्रवादीचे नेते उपस्थित असतात. सरकार बदलल्यामुळे या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आमंत्रण देण्यात आले होते. ते मेळाव्यास येणार असल्याचे सांगितले होते. परंतु ते मेळाव्यास आलेच नाहीत. याविषयी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.