शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन बायका असलेल्या तरुणाची प्रेयसीसह आत्महत्या

By admin | Updated: May 17, 2016 18:57 IST

घरच्यांनी प्रेमाला नकार दिल्याने एका प्रेमीयुगुलाने मंगळवार, १७ मे रोजी पहाटे ५ वाजता आत्महत्या केल्याची घटना नई जिंदगी परिसरात घडली.

सोलापूर : घरच्यांनी प्रेमाला नकार दिल्याने एका प्रेमीयुगुलाने मंगळवार, १७ मे रोजी पहाटे ५ वाजता आत्महत्या केल्याची घटना नई जिंदगी परिसरात घडली. 
रमेश यलप्पा शिपरी (वय ३०, रा़ सिद्धेश्वरनगर-भाग ५, नई जिंदगी, सोलापूर) व दुर्गाव्वा दयामन्ना लळूडे (वय २५, रा़ आनंदनगर, हुबळी, राज्य- कर्नाटक) अशी प्रेमीयुगुलाची नावे आहेत़. 
याबाबत एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश व दुर्गाव्वा या दोघांचे मागील तीन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते़ दुर्गाव्वा ही मूळची हुबळी शहरातील आनंदनगर भागात राहणारी आहे़. रमेश याच्यावर जिवापाड प्रेम असल्याने दुर्गाव्वा ही दर आठवड्याला दोन ते तीनदा खास रमेशला भेटायला येत होती़ हा प्रकार दुर्गाव्वा हिच्या आईला समजल्यानंतर आईने दुर्गाव्वाला त्या रमेशचा संसार उद्ध्वस्त करू नको, नीट वाग, असे समजावून सांगितले होते़. त्यावेळी दोघा मायलेकीमध्ये भांडण झाले होते़. या भांडणाच्या रागाने दुर्गाव्वा ही नई जिंदगी परिसरात राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे आली होती. प्रेमाला नकार दिल्याचा राग मनात धरून रमेश व दुर्गाव्वा या दोघांनी मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास पत्र्याच्या छताला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना उघडकीस येताच परिसरात राहणाºया नागरिकांनी या दोघांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच मयत झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी व एमआयडीसी पोलीस चौकीत करण्यात आली आहे़.
 
रमेश याला दोन बायका
 
आत्महत्या केलेल्या रमेश याला राधिका व रेणुका या दोन बायका आहेत़ दुर्गाव्वा ही रेणुका हिची सख्खी बहीण आहे़ म्हणजेच रमेशची मेहुणी़ रमेश हा मजुरी करीत होता़ मात्र दुर्गाव्वा हिच्याबरोबर प्रेम जडले होते़ मात्र प्रेमास नकार व आड येणाऱ्या घरच्यांना कंटाळून या दोघांनी आपली जीवनयात्रा संपविली.