शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

उच्चशिक्षित दाम्पत्याची मुलीसह आत्महत्या

By admin | Updated: April 24, 2017 04:05 IST

इंजिनीअर पती आणि डॉक्टर पत्नीने आपल्या पंधरा वर्षीय मुलीसह आत्महत्या केली. पनवेलजवळच्या कामोठे वसाहतीत रविवारी सकाळी ही घटना घडली.

कळंबोली (नवी मुंबई) : इंजिनीअर पती आणि डॉक्टर पत्नीने आपल्या पंधरा वर्षीय मुलीसह आत्महत्या केली. पनवेलजवळच्या कामोठे वसाहतीत रविवारी सकाळी ही घटना घडली. आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे ‘सुसाइड नोट’मध्ये लिहिलेले आहे.येथील सेक्टर ३६मध्ये इंद्रविहार इमारतीमध्ये इंद्रजीत दत्ता (५०), त्यांची पत्नी जास्मीन पटेल (४५) आणि मुलगी ओशीन राहत होते. जास्मीन गंभीर आजाराने त्रस्त होत्या. त्यामुळे नैराश्यातून त्यांनी जीवनयात्रा संपविण्याच्या निर्णय घेतला. पण आपल्या पश्चात मुलीचे काय होणार, या चिंतेतून त्यांनी ओशीन हिलाही आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आणि दोघींनी गळफास घेतला.त्या वेळी बाहेर गेलेले पती इंद्रजीत दत्ता चावीने घर उघडून आत गेले असता त्यांना मायलेकी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्या. त्यामुळे त्यांना प्रचंड धक्का बसला. त्यातून त्यांनीही गळफास घेतला. दोघांनीही दोन सुसाइड नोट लिहून ठेवल्या असून यात ही माहिती नमूद आहे. डॉ. जास्मिन यांनी मोलकरणीला दोन दिवस कामावर येऊ नको, असे सांगितले होते. त्यामुळे तिने सुट्टी घेतली होती, परंतु रविवारी सकाळी ती घरकामासाठी आली असता दरवाजाला चावी तशीच होती. तिने दार उघडले तेव्हा हा आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. (प्रतिनिधी)

कर्जबाजारी झाल्याचीही चर्चा-कर्जबाजारीपणामुळे या कुटुंबाने आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात सुरू होती. तसेच इंद्रजीत आणि जास्मिन हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचेही बोलले जात आहे. परंतु याला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.देह अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना द्यावेत : आमच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता केईएम येथे विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता दान करावेत, अशी इच्छा सुसाइड नोटमध्ये व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार तिघांचेही मृतदेह केईएम रुग्णालयात पाठवल्याची माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त बी. एस. बुधवंत यांनी दिली.