चिखलगाव/सायखेड (जि.अकोला) : छेडछेडीला कंटाळून एका युवतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी बार्शीटाकळी तालुक्यातील जलालाबाद येथे उजेडात आली. या प्रकरणी तिच्या कुटुंबियांनी छेड काढणाऱ्या युवकांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. ही युवती चिखलगावमध्ये शाळेत इयत्ता १०वीत शिकत होती. काही दिवसांपासून गावातील तीन युवक तिची छेड काढत होते. सुरुवातीला तिने याकडे दुर्लक्ष केले. हा त्रास असह्य झाल्याने शनिवारी रात्री उशिरा तिने गावातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारी युवतीवर अंतिमसंस्कार करण्यात आले. शवविच्छेदन अहवालानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. (वार्ताहर)
छेडछाडीला कंटाळून युवतीची आत्महत्या
By admin | Updated: September 7, 2015 01:35 IST