शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीच्या घरासमोरच आत्महत्या

By admin | Updated: April 10, 2016 03:00 IST

प्रेयसीचे लग्न झाल्यानंतरही तिचा पिच्छा पुरवणाऱ्या प्रियकराने तिच्या घरासमोरच स्वत:ला मोटारीमध्ये कोंडून पेटवून घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी हडपसर येथील ग्लायडींग सेंटरसमोर

पुणे : प्रेयसीचे लग्न झाल्यानंतरही तिचा पिच्छा पुरवणाऱ्या प्रियकराने तिच्या घरासमोरच स्वत:ला मोटारीमध्ये कोंडून पेटवून घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी हडपसर येथील ग्लायडींग सेंटरसमोर पहाटे साडेसहाच्या सुमारास घडली. अजित आत्माराम इंगळे (२६, रा. मंगळवार पेठ, ता. फलटण, जि. सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंगळे हा फलटणमध्ये इलेक्ट्रिकल ठेकेदार आहे. त्याचे नात्यातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. ही तरुणी हडपसर-सासवड रस्त्यावरच्या ग्लायडींग सेंटरसमोर राहत आहे. त्यांच्या प्रेमसंबंधाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. त्यांनी इंगळेचा लग्नाचा प्रस्ताव नाकारत तरुणीचे दुसऱ्या मुलासोबत लग्न लावून दिले. परंतु लग्नानंतरही त्याने तिचा पिच्छा सोडला नाही. ‘माझ्याशी लग्न कर. नाहीतर मी तुझ्या घरासमोर आत्महत्या करेन,’ अशी धमकी तो देत होता. गुढीपाडव्याला तरुणी माहेरी आली होती. याची माहिती मिळताच तो फलटणवरून मित्राची मोटार घेऊन पुण्यामध्ये आला. तरुणीला फोन करून त्याने ‘भेटायला ये, अन्यथा तुझ्या घरासमोर आत्महत्या करीन’ अशी धमकी दिली व मोटारीमध्येच स्वत:ला पेटवून घेतले. गाडीमधून मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागल्यावर नागरिकांनी गाडीच्या काचा फोडून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाऱ्यामुळे आग भडकली. आत्महत्या करण्यापूर्वी इंगळेने फेसबुकवर शेवटची पोस्ट अपलोड केली होती. प्रेयसीचे नाव लिहिलेला त्याचा फोटो त्याने फेसबुक वॉलवर कव्हर फोटो म्हणून ५ वाजून २४ मिनिटांनी अपलोड केला होता. (प्रतिनिधी)फलटणमध्ये अंत्यसंस्कारअग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवल्यावर इंगळेचा जळालेला मृतदेह मिळाला. फलटण येथील स्मशानभूमीत अजित इंगळेवर शनिवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.