शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

शिर्डीत तरुणाची पोलीस ठाण्यात गळफास घेऊन आत्महत्या

By admin | Updated: March 31, 2016 16:22 IST

पाकीटमारीच्या आरोपाखाली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाने पोलीस ठाण्यातच आपल्या कमरेच्या बेल्टने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
शिर्डी, दि. ३१ - पाकीटमारीच्या आरोपाखाली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाने पोलीस ठाण्यातच आपल्या कमरेच्या बेल्टने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. किरण अशोक रोकडे(18) असे या तरुणाचे नाव आहे. 
 
गुरुवारी दुपारी साडे अकराच्या सुमारास या तरुणाला मंदिर परिसरात पाकीटमारीच्या संशयावरून मंदिर सुरक्षा रक्षक राक्षे व पिंपळे यांनी शिर्डी पोलिसांत दिले होते. ठाणे अंमलदार आयुब शेख यांनी त्याला लॉकअप गार्डच्या ताब्यात दिले. यांनंतर काही वेळात या तरुणाने लॉकअपच्या दरवाजाला आपल्याच कमरेचा बेल्टच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. सव्वा बाराच्या सुमारास हा प्रकार लक्षात येताच ठाणे अंमलदार शेख यांनी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना हा प्रकार कळवला, त्यानंतर वाघ यांनी तातडीने तरुणाला साईबाबा रुग्णालयात दाखल केले.  रुग्णालयात उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला.
 
पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले होते तर त्याच्याकडील चीजवस्तू काढून का घेतली नव्हती ? त्याने स्वतः गळफास घेतला तेव्हा कोठडीचे सुरक्षा रक्षक कुठे होते ? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यावेळी कोठडीच्या सुरक्षेसाठी सहाय्यक फौजदार रज्जाक शेख, पोलीस कर्मचारी माने व आव्हाड हे ड्युटीवर होते. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी शिर्डीत दाखल होत आहेत. नातेवाईकांच्या मागणीनुसार पोस्टमार्टेम पुणे येथे करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.