शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आरोपी पळाल्याने केली आत्महत्या!

By admin | Updated: January 16, 2015 05:55 IST

ताब्यातील आरोपी पळून गेल्यानंतर संभाव्य कारवाईच्या भीतीने अजीम खान पठाण उर्फ बाबा पठाण या पोलिसाने गोळी झाडून आत्महत्या

बीड : ताब्यातील आरोपी पळून गेल्यानंतर संभाव्य कारवाईच्या भीतीने अजीम खान पठाण उर्फ बाबा पठाण या पोलिसाने गोळी झाडून आत्महत्या केल्याचे गुरुवारी उघड झाले़ बुधवारी रात्री त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले होते़ त्यांच्याजवळील बॅगेमध्ये सापडलेल्या चिठ्ठीतून हा खुलासा झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.बीड पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले अजीम खान पठाण उर्फ बाबा पठाण यांच्याकडे जिल्हा कारागृहातील आरोपी न्यायालयात ने-आण करण्याची जबाबदारी होती. अजीम खान पठाण व गोपीचंद कंगाले यांच्यावर जबरी चोरीतील आरोपी सतीश चव्हाण याला गेवराई न्यायालयात नेण्याची जबाबदारी दिली होती. त्यानुसार त्यांनी कारागृहातून आरोपी चव्हाणला ताब्यात घेतले.न्यायालयात हजर करून बीडकडे परतत असताना चव्हाण पळून गेला. त्यामुळे पठाण व कंगाले हे घाबरून गेले. दरम्यान, सायंकाळी पठाण हे मुख्यालयात परतले. आरोपी पळून गेल्याने आपल्यावर कारवाई होईल, या भीतीपोटी पोलीस मुख्यालयातील शस्त्र जमा करण्याच्या ठिकाणी पठाण यांनी गोळी झाडून आत्महत्या केली़ त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.गुरुवारी सकाळी पठाण यांचा दफनविधी करण्यात आला. अजीम खान पठाण यांच्या आत्महत्ये प्रकरणी शिवाजी नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी बुधवारी रात्री कंगाले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नव्हता. गुरुवारी कंगाले यांची चौकशी केली असता कंगाले हा वेगवेगळे जबाब देत होता. त्यामुळे आरोपी सतीश चव्हाण हा कोठून व कसा पळून गेला हे समजू शकले नव्हते. त्याची चौकीशी सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आत्महत्येच्या या प्रकारामुळे हळहळ व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)