शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरुन सुनेची हत्या करून सास-याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2017 12:38 IST

चारित्र्याच्या संशयावरून सास-यानं सुनेच्या डोक्यात लोखंडी सळईने जोरदार प्रहार करुन निर्घृण हत्या केली.परभणीतील ही घटना आहे.

ऑनलाइन लोकमत
पाथरी (परभणी), दि. 9-  चारित्र्याच्या संशयावरून सास-यानं सुनेच्या डोक्यात लोखंडी सळईने जोरदार प्रहार करुन निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे सुनेची हत्या केल्यानंतर सासऱ्यानं स्वतः आत्महत्या केली आहे.  पाथरी तालुक्यातील नाथरा येथे गुरुवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.  
 
पाथरी तालुक्यातील नाथरा येथील दामोदर रामभाऊ डुकरे (वय 70 वर्ष) यांचा मुलगा अंतराम डुकरे यांचा माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव येथील सौमित्रा यांच्यासोबत  2011 मध्ये विवाह झाला होता. या दाम्पत्याला दोन वर्षाची एक मुलगी आहे.  
 
गुरुवारी मध्यरात्री सौमित्रा ही झोपेत असताना 12.30 वाजण्याच्या  सुमारास सासऱ्याने लोखंडी पाहरीने सौमित्राच्या डोक्यात जोराचा वार केला. सपासप वार झाल्याने अंगणात झोपलेल्या सौमित्राचा पती अंतराम यांना जाग आली. 
 
ते तातडीने घरात गेले असता सौमित्रा रक्ताच्या थारोळ्यात  पडल्याचे दिसले. मुलाने वडिलांना आवरण्याचा प्रयत्न केला. या गोंधळामुळे शेजारील मंडळीही जागी झाली व त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा  आरोपी सासरा शेताकडे पळून गेला. 
 
या घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी पाथरी पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर पोलीस निरीक्षक सोहन माचरे, सह पोलीस निरीक्षक रामोड आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. सासऱ्याचा शोध घेतला असता त्यांना शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला.