नवी मुंबई : विवाहित असल्याची लपवून प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्यामुळे तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नेरूळमध्ये घडली आहे. आत्महत्येसाठी तरुणीने हार्पिक पिल्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तरुणाविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरूळची राहणारी ही तरुणी वाशीत एका कंपनीत कामाला आहे. २०१०मध्ये कामाच्या माध्यमातून अमित अब्रोल नावाच्या तरुणासोबत तिची ओळख झाली. या वेळी त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले होते. गेल्यामहिन्यात अमितचे लग्न झाल्याचे तरुणीला कळले. प्रियकराकडून फसवणूक झाल्याने आलेल्या नैराश्येतून तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)>दोन फेसबुक अकाऊंटअमित हा राकेश शर्मा नावाने देखील परिचित असून या नावाने त्याचे फेसबुक अकाऊंटही आहे. त्यामुळे फसवणूक झाल्याचे कळताच तरुणीने नेरूळ येथील राहत्या घरात हार्पिक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
प्रेमभंग झाल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Updated: March 6, 2017 02:53 IST