शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीची कोठडीत आत्महत्या

By admin | Updated: May 3, 2016 03:01 IST

घरफोडीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुलुंड पोलीस ठाण्याच्या कोठडीत शर्टाच्या साहाय्याने गळफास घेतल्याची घटना घडली. अमित राठोड (२०) असे

मुंबई : घरफोडीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुलुंड पोलीस ठाण्याच्या कोठडीत शर्टाच्या साहाय्याने गळफास घेतल्याची घटना घडली. अमित राठोड (२०) असे मृत आरोपीचे नाव असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. केशवपाडा येथील रहिवासी असलेल्या राठोडला २९ एप्रिल रोजी घरफोडीच्या गुन्ह्यांत अटक केली होती. न्यायालयाने त्याला ३ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली होती. रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास नैसर्गिक विधीसाठी जातो असे सांगून राठोड तेथील शौचालयात गेला. शौचालयातील खिडकीच्या ग्रीलला शर्टाच्या सहाय्याने गळफास घेत त्याने आत्महत्या केली. आपला आवाज कुणापर्यंत पोहचू नये म्हणून आत्महत्येपूर्वी त्याने शौचालयातील पाण्याचा नळ सुरु ठेवला होता. त्याच्यासह या कोठडीत तीन कैदी होते. कोठडीच्या बाहेर पोलीस हवालदार पहारा देत असतात. बराच वेळ झाला तरी नळ सुरु असल्यामुळे तेथील हवालदाराला संशय आला. शौचायलायचे दार उघडले असता राठोड गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तत्काळ मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याला साडेतीनच्या सुमारास मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड पश्चिमेकडील स्वप्ननगरी परीसरातील सरला नायर यांच्या घरातून त्याने सव्वा पाच लाखांची रोकड लंपास केली. नायर यांच्याकडे राठोडची पत्नी मोलकरीण म्हणून काम करायची. त्यामुळे घरात रोख रक्कम असल्याची माहिती राठोडला मिळाली. त्याने संधी साधून घरातील पैशांवर हात साफ केला होता. मात्र तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये राठोडचा प्रताप कैद होताच त्याला मुलुंड पोलिसांनी अटक केली.आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखाही समांतर तपास करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी दिली. (प्रतिनिधी)गुन्हे शाखेकडून तपास सुरूराठोडच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हे शाखा अधिक शोध घेत आहे. मुलुंड पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर अग्रवाल रुग्णालय आहे. अशा वेळी त्यांच्या ही बाब कधी लक्षात आली? तेथील पोलीस कोठे होते? याचा शोध सुरु आहे. संबंधित पोलीस हवालदार, अधिकारी यांच्यासह त्याच्यासोबत असलेल्या कैद्यांकडेही चौकशी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष ७ चे वरिष्ठ निरीक्षक संजय सुर्वे यांनी दिली. अंगावर जखमा नाहीतराठोडच्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात असताना त्याचा मृतदेहावर कुठल्याही जखमा नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. केवळ गळ्याभोवती गळफासाचे व्रण आहेत. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात श्वास गुदमरल्यामुळे त्याचा मत्यू झाल्याचे समोर आले आहे. शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल अद्याप मिळालेला नाही. त्यातून यामागचे नेमके कारण समोर येईल असेही सुर्वे यांनी सांगितले.