शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

साखर कामगारांची ‘दिवाळी’

By admin | Updated: October 7, 2016 06:02 IST

राज्यातील साखर कारखान्यांतील कामगारांना १५ टक्के वेतनवाढ देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील २0५ साखर कारखान्यांत काम करणाऱ्या दीड लाख साखर कामगारांची दिवाळी गोड होणार

प्रकाश पाटील, कोपार्डे (कोल्हापूर) राज्यातील साखर कारखान्यांतील कामगारांना १५ टक्के वेतनवाढ देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील २0५ साखर कारखान्यांत काम करणाऱ्या दीड लाख साखर कामगारांची दिवाळी गोड होणार आहे. ही वाढ आॅक्टोबरच्या पगारात देण्यात यावी, असे आदेश महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बाबर यांनी साखर कारखान्यांना दिले आहेत.राज्यातील साखर कारखान्यांत काम करणाऱ्या कामगारांच्या वेतन कराराची मुदत एप्रिल २0१४मध्ये संपली होती. त्यानंतर राज्य सरकारने शिवाजीराव गिरीधर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ८ जुलै २0१५ रोजी त्रिपक्षीय समितीची नेमणूक केली. समिती नियुक्त होऊनही वेतन कराराला विलंब होत असल्याने राज्य साखर कामगार संघटनेने २ जानेवारी २0१६ रोजी बेमुदत संपाचा इशारा दिला होता. मात्र, कारखान्यांचे गाळप हंगाम अडचणीत येणार असल्याने शरद पवार यांनी मध्यस्थी केल्यानंतर ९०० रुपये हंगामी वेतनवाढ देण्यात आली. तसेच अंतिम वेतनवाढ दोन महिन्यांत मार्गी लावू, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, त्याची पूर्तता न झाल्याने साखर कामगारांमध्ये असंतोषाला सुरुवात झाल्याने शरद पवार यांनी यामध्ये स्वत: लक्ष घालून त्याबाबत निर्णय घेण्याचे आदेश साखर आयुक्त व यंत्रणेला दिले. साखर कामगारांना १ एप्रिल २0१४ रोजी असलेल्या वेतनश्रेणीत १५ टक्के पगारवाढ देण्यात येणार आहे. ४ जुलै २0१६ रोजीच्या करारातील कलम ३३मधील तरतुदीनुसार प्रत्येक साखर कारखाना आणि प्रतिनिधी व मान्यताप्राप्त युनियन यांनी त्यांना लागू असलेल्या मुंबई औद्योगिक संबंध कायदा १९४६च्या संबंधित तरतुदीनुसार वेतनवाढीचे करार करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.१ एप्रिल २0१४ रोजी साखर कामगारांना असलेल्या वेतनश्रेणीच्या आधारे १५ टक्के पगारवाढ देण्यात येणार आहे. या पगारवाढीत धुलाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता, महागाई भत्ता इत्यादी वाढींचा समावेश राहील.‘लोकमत’वरअभिनंदनाचा वर्षावसाखर कामगारांच्या वेतनवाढीबाबत ‘लोकमत’मधून सातत्याने पाठपुरावा होत होता. अलीकडेच ‘वेतन करार झाला; पण अंमलबाजावणी नाही’ या मथळ्याखालील वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत वेतन करार लागू करण्याचे आदेश निर्गमित झाल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. कामगार वर्गातून ‘लोकमत’चे अभिनंदन केले जात आहे.गेली अडीच वर्षे साखर कामगारांचा वेतन करार रेंगाळला होता. ऐन दिवाळीच्या तोंडावर साखर आयुक्त पातळीवर हा करार लागू करण्याचे आदेश आल्याने साखर कामगारांची दिवाळी गोड होणार आहे.- सरदार पाटील, साखर कामगार प्रतिनिधी, कुंभी-कासारी