शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
4
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
5
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
6
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
7
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
8
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
9
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
10
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
11
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
12
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
13
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
14
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
15
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
16
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
17
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
18
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
19
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
20
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप

साखर हंगाम निम्म्यावर...कारखानदार गॅसवर...!

By admin | Updated: January 20, 2015 23:42 IST

सव्वाचार कोटी टन गाळप : अजून तेवढाच ऊस शिल्लक

विश्वास पाटील - कोल्हापूर -राज्यातील साखर हंगाम निम्म्यावर व बाजारातील साखरेचे दर घसरल्याने कारखानदार मात्र गॅसवर अशी साखर उद्योगाची आजची स्थिती आहे. केंद्र सरकार या उद्योगास पॅकेज देणार आहे परंतु ते नेमके कधी पदरात पडते यासंबंधी कोणतीच ठोस माहिती नसल्याने कारखानदार गॅसवर आहेत.साखर आयुक्तालयाने राज्यातील १८ जानेवारीपर्यंतची हंगामाची गाळपाची माहिती उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार राज्यात ७६ खासगी कारखान्यांसह १७४ कारखाने सुरू आहेत. आतापर्यंत ४१९ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून ४४७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १०.६८ असून तो गतवर्षीच्या तुलनेत पाँईट १० ने जास्त आहे. राज्य शासनाने हंगामाच्या सुरुवातीस किमान ६९७ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट जाहीर केले होते, परंतु परतीचा पाऊस व हवामानही उसाला पोषक राहिल्याने आतापर्यंत गाळप झालेल्या पूर्वहंगामी, आडसाली व सुरू या तिन्ही प्रकारांतील लागणीला चांगले टनेज मिळाले आहे. शासनानेच यंदा ८०० लाख टन उसाचे गाळप होईल, असा सुधारित अंदाज व्यक्त केला आहे. या पुढील गाळप हे मुख्यत: खोडवा उसाचे असेल. त्यामुळे त्यास लागणीइतके प्रतिएकर टनांचे उत्पादन मिळणार नाही तरीही आठशे लाख टन गाळप विचारात घेतल्यास यंदाचा हंगाम मार्चअखेरपर्यंत सुरू राहील. काही कारखाने एप्रिलपर्यंत व अगदी मोजके मेपर्यंत सुरू राहतील.यंदा ऊस चांगला आहे परंतु बाजारातील साखरेने सगळे वांदे केले आहे. हा दर २५०० रुपये क्विंटलपर्यंत घसरल्याने कारखान्यांना एफआरपी देताना अडचणी आल्या आहेत. राज्य सरकार एका बाजूला मदतीसाठी प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला कारखान्यांवर कारवाईचा बडगाही उगारला आहे. त्यामुळे ही मदत झाली तरच कारखानदारांची अडचण दूर होईल. अन्यथा मोजके कारखाने वगळता सर्वांचेच आर्थिक ‘आजारपण’ वाढणार आहे.दृष्टिक्षेपात १८ जानेवारीअखेरचे राज्यातील गाळपविभागकारखाने सुरूगाळप साखर उत्पादन साखर उतारा(कंसात खासगी)(लाख टन)(लाख क्विंटल) (टक्के)कोल्हापूर३७(१०)९६.९२११५.४६११.९१पुणे५७ (२६)१६४.७८१७४.६२१०.६०अहमदनगर२३(०९)५८.२२६०.८११०.४४औरंगाबाद२२ (०९)३७.२२३४.७७०९.३४नांदेड२९ (१७)५७.०१५७.२११०.०४अमरावती०२ (०१)०२.६९२.५९९.६५नागपूर०४ (०४)०२.२२२.०२९.०७एकूण१७४ (७६)४१९.०६४४७.४७१०.६८