शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात साखरेच्या दरात आठ रुपयांची वाढ

By admin | Updated: March 6, 2016 09:09 IST

केंद्र सरकारने सक्ती केल्याने बाजारपेठेतील साखरेच्या दरात वाढ होत आहे. गेल्या आठ दिवसांत घाऊक बाजारात प्रति क्विंटल ७० ते ८० रुपयांची वाढ झाली

कोल्हापूर : दुष्काळामुळे राज्यातील साखर उत्पादन घटणार आहे, त्यातच निर्यातीसाठी केंद्र सरकारने सक्ती केल्याने बाजारपेठेतील साखरेच्या दरात वाढ होत आहे. गेल्या आठ दिवसांत घाऊक बाजारात प्रति क्विंटल ७० ते ८० रुपयांची वाढ झाली आहे. बाजारातील मागणी व उत्पादन पाहता साखर तीन हजारांवर स्थिरावेल, असा अंदाज असून किरकोळ बाजारात साखर ७ ते ८ रुपयांनी महाग होण्याची चिन्हे आहेत.यंदाचा साखर हंगाम सुरू होण्यापूर्वी साखरेच्या दराने आतापर्यंतचा नीचांक गाठला होता. त्यानंतर प्रत्येक महिन्याला साखरेच्या दरात थोडी थोडी वाढ होत गेली. त्यात हंगामाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने एकूण उत्पादनाच्या १२ टक्के निर्यात कोटा दिल्याने त्याचा परिणामही बाजारपेठेवर झाला. त्यात दुष्काळामुळे उसाच्या उत्पादनात घट झाल्याने परिणामी साखर उत्पादन कमी होणार आहे. गत वर्षी राज्यात ९२९ लाख टन उसाचे उत्पादन झाले होते. यावर्षी कसेतरी ७०० लाख टन गाळप होईल, अशी परिस्थिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ दिवसांपूर्वी राज्यातील साखर कारखान्यांची आढावा बैठक घेऊन निर्यातीबाबत कारखान्यांना इशारा दिला होता. देशात ४० लाख टन साखर निर्यात होणार आहे. त्यापैकी नऊ लाख टनच साखर निर्यात झाली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत सुमारे चार लाख टन साखर निर्यात झाल्याने बाजारपेठेवर त्याचा परिणाम दिसत आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून घाऊक बाजारात सध्या २९७५ रुपये प्रतिक्विंटल दराने साखर विक्री होत आहे. (प्रतिनिधी)

हंगामात असे वाढले प्रतिक्विंटलचे दर -आॅक्टोबर - २४००, नोव्हेंबर - २६००, डिसेंबर - २७००, जानेवारी - २८५०, फेबु्रवारी - २९००, मार्च - २९७५ रुपये.

> निर्यातीची केलेली सक्ती, दुष्काळामुळे उसाचे घटलेले उत्पादन यामुळे साखरेचे दर वाढू लागले आहेत. उत्पादन व बाजारपेठेतील मागणी पाहिली तर आगामी काळात तीन हजारांवर साखर स्थिरावेल. - पी. जी. मेढे, साखर तज्ज्ञ, कोल्हापूर